Buldhana Accident : महामार्गावर कारचा टायर का फुटतो? लांबचा प्रवास करण्याआधी या गोष्टी अवश्य तपासा

| Updated on: Jul 01, 2023 | 1:32 PM

बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील सिंदखेडराजामधील पिंपळखुटा येथे मध्यरात्री दिड वाजता बसचा टायर फुटल्याने ती अनियंत्रीत झाली आणि दुभाजकावर धडकून उलटली. अपघात होताच बसने पेट घेतला.

Buldhana Accident : महामार्गावर कारचा टायर का फुटतो? लांबचा प्रवास करण्याआधी या गोष्टी अवश्य तपासा
समृद्धी महामार्गावर झालेला भिषण अपघात
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway bus Accident) काल मध्यरात्री भिषण अपघात झाला.  या अपघातात तब्बल 26 प्रवाश्यांचा मृत्यू झाला. हा अपधात इतका भयंकर होता की बसमधील काही प्रवाश्यांचा अक्षरशः जळून कोळसा झाला. बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील सिंदखेडराजामधील पिंपळखुटा येथे मध्यरात्री दिड वाजता बसचा टायर फुटल्याने ती अनियंत्रीत झाली आणि दुभाजकावर धडकून उलटली. अपघात होताच बसने पेट घेतला. यात तीन प्रवासी बसची मागची खिडकी फोडून बाहेर आले आणि जीव वाचवीला. या आधीही गाडीचा टायर फुटल्याने अनेक अपघात झालेले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तर शेकडो लोकांनी अशा प्रकारच्या अपघातात जीव गमावला आहे. विशेष बाब म्हणजे अशा प्रकाच्या अपघाताबद्दल जनजागृती करण्यासाठी महामार्गावर इशारा फलकही लावण्यात येतात. तुम्हीसुद्धा महा मार्गावर प्रवास करीत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

टायर्समधील हवेचा दाब

कारच्या टायरमधील हवेचा दाब नेहमी त्या आकारासाठी शिफारस केल्याप्रमाणेच असावा. दुसरीकडे, जर तुम्ही उन्हाळ्यात टायरमध्ये सामान्य हवा भरत असाल तर टायर पूर्णपणे भरू नका. त्यात दोन ते तीन पौंड हवा ठेवा. कारण तुम्ही रस्त्यावर सतत गाडी चालवता तेव्हा टायर गरम होतात. यासोबतच त्यातील हवाही गरम होऊन त्याचा विस्तार होऊ लागतो. टायरमध्ये जास्त हवा असल्यास तो फुटून मोठी दुर्घटना घडते. याच कारणाने उन्हाळ्यत टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते.

जुने टायर बदलून घ्या

जर टायर खूप जुने झाले असतील किंवा तुम्ही बराच काळ वाहन चालवले नसेल आणि ते एका जागी पार्क केले असेल तर ते टायर बदलून घ्या. कारच्या जुन्या टायरमुळे ते गरम हवेचा दाब सहन करू शकत नाहीत आणि ते फुटतील. दुसरीकडे, कार जास्त वेळ चालवली नाही, तर गाडीच्या टायरचे रबर कडक होते. अशा परिस्थितीत जेव्हा हवा गरम होते आणि विस्तारते तेव्हा टायर त्यानुसार ताणत नाहीत. अशा स्थितीत त्यांचा स्फोट होतो.

हे सुद्धा वाचा

वेगाचाही मोठा परिणाम होतो

टायर फुटल्यामुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तुम्ही वाचलेल्या बहुतेक बातम्या एक्सप्रेसवे किंवा हायवेच्या असतील. हे का घडते हा समजून घेण्याचा मुद्दा आहे. बहुतेक द्रुतगती मार्ग सिमेंटचे किंवा अगदी सामान्य डांबराचे बनलेले आहेत. त्यांची रुंदी खूप जास्त आहे. त्यामुळे लोकांना गाडीचा वेग वाढवण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण लांब पल्ल्याच्या रस्त्यावर टायरचे घर्षण जास्त होते. अशा स्थितीत टायर नवीन असो वा जुने, ते खूप गरम होतात. त्यामुळे रबर रस्त्यावर चिकटू लागतो आणि टायरचा थर पातळ होतो. बराच वेळ वेगात गाडी चालवताना त्यांचा स्फोट होतो.

टायरमध्ये नायट्रोजन भरा

कारच्या टायरमध्ये नायट्रोजन अवश्य भरा. हे फार महत्त्वाचे आहे. नायट्रोजन अतिशय थंड असल्याने उच्च दाब असतानाही ते टायर थंड ठेवते. अशा स्थितीत गाडीचे टायर थंड राहतात आणि ते फुटत नाहीत.