भारतात सर्वाधिक विक्री होत असलेल्या गाड्यांच्या यादीमध्ये टाटा मोटर्सचा (Tata Motors) दुसरा क्रमांक लागतो. टाटाने ह्युंदाईला (Hyundai) मागे टाकत हे स्थान पटकाविले आहे. मेमध्ये टाटाने 43 हजारांहून जास्त युनिट्सची विक्री केली आहे. ग्राहकांना आपल्याकर्ड आकर्षित करण्यासाठी टाटा आपल्या कार्समध्ये वेळोवेळी विविध बदल करीत आलेला आहे. या शिवाय आपल्या कार्सवरदेखील अनेक ऑफर्स देण्यात येत असतात. टाटाने आपल्या एसयुव्ही सेगमेंटच्या गाड्यांवरही आकर्षक डिस्काउंट (Discount) दिले आहे. टियागो, नेक्सॉन, सफारी आणि हॅरियरसारख्या अनेक गाड्यांना हे डिस्काउंट देण्यात येत आहे. या लेखातून कोणत्या गाड्यांना किती डिस्काउंट मिळतेय, ते जाणून घेउया.
1) टाटा हॅरियर : टाटा मोटर्सची हॅरियर ही ग्राहकांच्या आवडत्या कारमधील एक आहे. लुक्स, परफॉर्मेंस आणि डायनिमिक्सच्या बाबतीत ही कार अतिशय आकर्षक आहे. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्यूअल गिअर देण्यात आले आहे. शिवाय यात ऑटोमॅटीक ट्रांसमिशनदेखील बाजारात उपलब्ध आहे. टाटा हॅरियरवर 60 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमध्ये एक्सचेंज ऑफर 40 हजार, कॉरर्पोरेट डिस्काउंट 20 हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.
2) टाटा सफारी : टाटा हॅरियरशिवाय सफारी या दुसर्या एका लोकप्रिय कारवरही मोठे डिस्काउंट मिळत आहे. सफारीवर कंपनी 40 हजार रुपयांचे डिस्काउंट देत आहे. कंपनी एक्सचेंज ऑफरच्या नावावर 40 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. हेरियर सारखे सफारीवर कुठल्याही प्रकारचा कॉरर्पोरेट डिस्काउंट मिळत नाही.
3) टाटा टियागो : टाटाच्या छोट्या कार्समध्ये टियागो सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. ही कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. सेफ्टी, कंफर्टच्या बाबतीत टाटाची ही कार अतिशय उत्कृष्ठ मानली जाते. टाटा टियागोवर 31500 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. यात एक्सएम आणि एक्सटी व्हेरिएंटवर 21500 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. तर एक्सझेड मॉडेलवर 31500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
4) टाटा टिगोर : कंपनीने टाटा टिगोरवर 31500 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट दिले आहे. कारच्या लोअर मॉडेल एक्सई आणि एक्सएम वर 21500 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. तर एक्सझेड व्हेरिएंटवर 10 हजार रुपयांचे अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. अशा पध्दतीने तुम्ही एकूण 31500 रुपयांचे डिस्काउंट या कारवर मिळवू शकतात.