तुम्ही अनेकदा ऐकले असेलच की या कारची बूट स्पेस इतकी लीटर आहे. तर स्कूटरची बूट स्पेस इतकी आहे. त्यानुसार कराच्या बूट स्पेसमध्ये इतके सामान भरण्याची क्षमता आहे. तसेच स्कुटर मध्ये देखील इतके सामान भरू शकता एवढी बूट स्पेस त्यात आहे. बूट स्पेसला सामान्य भाषेत आपण सर्वजण डिक्की म्हणतो. तसेच या डिक्की मध्ये आपण प्रवासाला जाताना किंवा आपले महत्वाचे सामान भरून घेऊन जात असतो. पण या डिक्कीचे मोज माप हे मीटर मध्ये न करता लीटर मध्ये केले जाते. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की गाडीची डिक्की लीटर मध्ये का मोजतात? चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या या प्रश्नाचे उत्तर…..
तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीची कार खरेदी करता तेव्हा तुम्हाला कंपनीच्या नुसार कारची डिक्की कारच्या क्षमतेनुसार असते असे सांगितले जाते आणि असेच सेम स्कूटरच्या बाबतीतही कंपनी नुसार डिक्कीची साईज बदलत असते. कार जितकी मोठी तितकी तिची डिक्की मोठी असते. बूट स्पेसचा आकार कार मॉडेलनुसार वेगवेगळा असतो. बऱ्याच कारमध्ये बूट स्पेसचा आकार लीटरमध्ये मोजला जातो आणि यामुळे तुम्हाला डिक्कीमध्ये किती सामान भरू शकता याची कल्पना येते. म्हणून डिक्कीचे मोजमाप लिटरमध्ये का करतो, त्यामागचे मुख्य कारण म्हणजे डिक्कीची रचना
या कारणामुळे आपण कारची डिक्की लीटरमध्ये मोजतो.
खरं तर प्रत्येक कराच्या रचनेनुसार डिक्की तयार केली जाते. त्यामुळे डिक्कीचे मोजमाप नीट करता येत नाही. समजा एका मीटरमध्ये एक इंच टेपमध्ये कारच्या डिक्कीचे मोजमाप करणे सोपे नसते. कारण डिक्की वर-खाली असून शकते. त्यात इंचाची टेप कोणत्या बाजूने ठेऊन त्याचे मोजमाप करायचे हे समजत नाही. कारण मीटरमध्ये मोजलं तर लांबी-रुंदी नीट नोंदवणं गरजेचं असतं. जे शक्य नाही. प्रत्येक कारच्या बूट स्पेस तिरक्या असतात. त्यामुळे त्यामध्ये अनेक कोपरे असून त्यांचे मोजमाप करणे सोपे नसते. म्हणूनच प्रत्येक कंपनी डिक्कीचे मोजमाप लीटरमध्ये करत असते. करा आपण एखाद्या भांड्यात किती द्रवपदार्थ राहिला आहे हे लीटर स्वरूपात मोजत असतो.
त्याचबरोबर त्याच्या तांत्रिक पैलूबद्दल बोलायचे झाले तर ज्या वस्तूंची रचना योग्य नसते. त्यांचे प्रमाण मोजणे करणे सोपे नसते. कारण त्यासाठी अचूक डेटाची गरज असते, जी त्याच्या आकारामुळे नीट मोजता येत नाही आणि उपलब्ध होत नाही. अशा वेळी डिक्कीसारख्या वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी लिटर, घनसेंटीमीटर किंवा घनमीटर वापरले जाते. केवळ कार आणि स्कूटरची जागाच नाही तर फ्रिजची जागाही लिटरमध्ये या आधारावर मोजली जाते.