मॉर्डन कारमध्ये एकाहून एक जबरदस्त फीचर्स येत आहेत. त्यातील काही फीचर्स तर अपघातावेळी तुम्हाला उपयोगी पडतात. आता सर्वच कारमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टिम हे फीचर देण्यात येते. पण काही रस्ते अपघातात कारच दरवाजा लॉक असल्याने प्रवाशांच्या बळीचे हे फीचर कारण ठरले आहे. सुरक्षेसाठी देण्यात येणाऱ्या या फीचरवरच आता प्रश्नचिन्ह उभं ठाकले आहे. राजस्थानमधील सीकर जवळील एका रस्ते अपघातात प्रवाशांना लॉकच उघडता न आल्याने त्यांचा जीव गेल्याचे समोर येत आहे. अशावेळी या फीचरचा कसा वापर करायचा, अपघातावेळी काय करायचे, जाणून घेऊयात..
सेंट्रल लॉकिंग सिस्टिम म्हणजे काय
सेंट्रल लॉकिंग सिस्टिम असते तरी काय असा अनेकांचा प्रश्न असतो. हे तंत्रज्ञान कार चालकाला एकाचवेळी सहप्रवाशांना दरवाजा लॉक, अनलॉक करण्याची सुविधा देतो. चालकाच्या बाजूला त्यासाठी एक लॉक बटण देण्यात येते. शिवाय त्यासाठी रिमोटचा पण वापर करता येतो. मॉर्डन कारमध्ये त्यासाठी रिमोट की सुद्धा देण्यात येत आहे. एका निश्चित अंतरावरुन तुम्हाला कारचे सर्व दरवाजे लॉक, अनलॉक करता येतात.
ही सिस्टिम कशी करते काम
सेंट्रल लॉकिंग सिस्टिम ही कोड्स आणि रेडिओ वेव्सद्वारे काम करते. म्हणजेच कारची चावी ही एका ट्रान्समीटरसारखी काम करते. तर कार एका रिसिव्हरसारखी काम करते. रिमोट की द्वारे कारला लॉक, अनलॉकची कमांड देण्यात येते. त्यानंतर दरवाजे उघडतात आणि बंद होतात. कारमधील सेंट्रल लॉक बटणाला पण हीच मात्रा लागू होते. कार चोरी होण्यापासून वाचविण्यासाठी आणि धावत्या कारमध्ये मुलांद्वारे बटण दाबून दरवाजा उघडता येऊ नये, यासाठी हे सुरक्षेचे फीचर देण्यात येते.
दुर्घटनेवेळी मोठे नुकसान
कार अपघातावेळी मात्र सेंट्रल लॉकिंग सिस्टिम मोठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे कारच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टिममध्ये बिघाड होण्याची दाट शक्यता आहे. बॉडी डॅमेज अथवा वायरिंग जळाल्याने इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम बंद पडते. जर सेंट्रल लॉकिंग सिस्टिम पहिल्यापासूनच ऑन असेल तर दरवाजे लॉकच राहतात. अपघातावेळी पत्र्याचे दरवाजांना मोठे नुकसान होते. त्यामुळे कारमधून बाहेर पडणे जिकरीचे होते.
उपाय तरी काय