वाहन चालवणाऱ्यांसाठी तसेच तुम्ही जेव्हा गाडीने प्रवास करताना किंवा गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. हे नियम नागरिकांच्या फायद्यासाठीच बनवलेले असतात. अशा परिस्थितीत वाहन चालवताना झालेली छोटीशी चूक ट्रॅफिक चालान कापू शकते. म्हणजेच मुलाला शाळेत सोडायचं की ऑफिसला जायचं, तसेच ऑफिसला जाण्यासाठी अनेकजण रोज कार, बाईक, स्कूटी वापरतात आणि कधी उशीर झाल्यावर घाईगडबडीत लाल सिग्नल असताना देखील नियमाचे उल्लंघन करून पुढे जातात. तर कधी बाईक-स्कूटी चालवण्याआधी हेल्मेट घालायला विसरतात. अश्याने तुमच्या गाडीचे चालान कापले जाते.
आता सर्वत्र ट्रॅफिक पोलिस असू शकत नाहीत, अशा परिस्थितीत रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पकडण्यासाठी सरकारने रस्त्यावर सिग्नलवर कॅमेरे बसवले आहेत. तुम्ही जर कोणते नियम मोडले तर या कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुटणे अशक्य असते, अनेकदा रस्त्यावरील कॅमेऱ्याने चालान कापले आहे हे तुम्हाला कळत नाही. आता अशा तऱ्हेने जर तुम्हालाही तुमच्या घाईगडबडीत कोणतेही चालान कापले गेले आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ई-चालान कसे तपासू शकता?
ट्रॅफिक चालान कापण्यात आले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan अधिकृत साइटवर जावे लागेल. या साईटवर जाऊन चालान नंबर, वाहन नंबर आणि डीएल नंबर टाकून अशा तीन प्रकारे तुम्ही चालान डिटेल्स काढू शकता.
जर तुम्हाला चालान नंबर माहित नसेल तर तुम्ही वाहननंबर टाकून ही चालान शोधू शकता. वाहन क्रमांक आणि कॅप्चा टाकून गेट डिटेलवर टॅप करताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. लक्षात घ्या की ओटीपी टाकल्याशिवाय तुम्ही लॉग इन करू शकणार नाही.
ओटीपी टाकताच तुमच्यासमोर संपूर्ण माहिती उघडेल आणि तुम्हाला तुमचा कार नंबर, तुमचे नाव, चालान नंबर, कोणत्या राज्यात चालान कापले आहे, चालान ची तारीख, चालान ची रक्कम, स्टेटस, पेमेंट सोर्स, चालान प्रिंट, पावती, पेमेंट लिंक अशा महत्त्वाच्या गोष्टी दिसतील.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे चालान चुकीच्या पद्धतीने कापले गेले आहे, तर तुम्ही त्यासाठी न्यायालयात दाद मागू शकता. जर तुम्हाला पेमेंट सोर्समध्ये NA दिसला आणि पेमेंट लिंकमध्ये स्टेटस लिहिलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं चालान कोर्टात गेलं आहे आणि आता तुम्हाला व्हर्च्युअल कोर्टामार्फत तुमचं चालान भरावं लागेल.