नवीन Kia Sonet चे हे 5 फीचर्स करतील दंग, Tata Nexon विसरुन जाल

| Updated on: Dec 20, 2023 | 4:06 PM

Kia Sonet | किआ सोनेटने बाजारात दमदार पाऊल टाकले आहे. ग्राहकांच्या अपेक्षापेक्षा या कंपनीने कमाल केली आहे. अनेक फीचर्सची रेलचेल सह काही कार कंपनीने बाजारात आणल्या आहेत. अर्थात या सेगमेंटमध्ये तिचा थेट सामना Tata Nexon शी होत आहे. पण काही फीचर्सच्या जोरावर ही कार उजवी ठरण्याची शक्यता आहे.

नवीन Kia Sonet चे हे 5 फीचर्स करतील दंग, Tata Nexon विसरुन जाल
Follow us on

नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : बाजारात सध्या Kia Sonet ची चर्चा रंगली आहे. या कारने बाजारात खास ग्राहक वर्ग तयार केला आहे. किआ सोनेट आणि टाटा नेक्सॉन कारचे फेसलिफ्ट झाले आहे. यामुळे या कारविषयी अनेक अपडेट समोर आले आहेत. फीचर्सच्या आधारावर ही कार उजवी ठरण्याची शक्यता बळावली आहे. या कारमध्ये काय काय फीचर्स देण्यात आले आहे, याविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. सोनेटमध्ये ज्या ऑफर देण्यात येत आहे. त्या नेक्सॉनमध्ये देण्यात आलेल्या नाहीत. कोणती आहेत ही फीचर्स?

  1. ADAS – किआ सोनेट फेसलिफ्टमध्ये लेवल-1 एडीएएस फीचर देण्यात आले आहे. हे फीचर नेक्सॉनमध्ये मिळणार नाही. सोनेटच्या एडीएएस मध्ये 10 फीचर्स आहेत. त्यात फॉरवर्ड कोलिजन अवॉइडेंस, लेन-कीप असिस्ट, लेन डिपार्चर वार्निंग आणि हाय-बीम असिस्ट यांचा समावेश आहे. यामध्ये टॉप-स्पेक जीटीएक्स+ आणि एक्स-लाइन व्हेरिएंटमध्ये एडीएएस मिळेल.
  2.  4-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट – किआ सोनेट फेसलिफ्टमध्ये 4-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे. तर टाटा नेक्सॉनमध्ये केवळ मॅन्युएल एडजस्टेबल फ्रंट सीट देण्यात आले आहे. फेसलिफ्टसह सोनेटचे HTX+, GTX+ आणि X-Line च्या व्हरिएंटमध्ये 4-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट देण्यात आले आहे.
  3. एलईडी साउंड एंबिएंट लायटिंग – किआ सॉनेटमध्ये समोरील दरवाज्यांना एलईडी साऊंड एंबिएंट लायटिंग देण्यात आली आहे. हे फीचर सोनेट फेसलिफ्टच्या मिड-स्पेक HTX+, GTX+ आणि X-लाईन व्हेरिएंट्समध्ये देण्यात आले आहे. तर, 2023 मधील नेक्सॉनमध्ये साउंड एंबिएंट लायटिंग देण्यात आलेली नाही.
  4. वन-टच ऑटो अप/डाउन – किआ सोनेट फेसलिफ्टच्या टॉप-स्पेक एक्स-लाईन ट्रिममध्ये चार पॉवर विंडोसाठी वन-टच ऑटो अप/डाउन फंक्शन देण्यात आले आहे. टाटा नेक्सॉनमद्ये केवळ ड्रायव्हर साईडच्या विंडोसाठी ऑटो अप/डाउन पॉवर फीचर देण्यात आले आहे. ते पण टॉप-स्पेक फीअरलेस व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. रिमोट इंजिन स्टार्ट – किआ सॉनेट फेसलिफ्टला स्मार्ट-की (Smart-Key) असेल. त्यामुळे ही कार तुम्ही अगदी दुरून पण स्टार्ट करु शकता. सॉनेट फेसलिफ्टच्या मिड-स्पेक HTX+ व्हेरिएंटमध्ये ही सुविधा मिळते. टाटा नेक्सॉनमध्ये ही सोय मिळत नाही.