मुंबई : सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा वापर वाहनांमध्ये इंधन म्हणून केला जातो. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत ग्राहकांसाठी ते खूपच किफायतशीर ठरते. शिवाय, पर्यावरणासाठी हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे प्रदूषण तर कमी होतेच, पण पेट्रोलपेक्षा स्वस्त असल्याने त्याचा वापर आता अधिक होत आहे. सरकारही सीएनजीच्या (CNG Kit Installation) वापराला प्रोत्साहन देते. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत, त्यानंतर अधिक मायलेज मिळवण्यासाठी लोक सीएनजी कार घेण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांत सीएनजी कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. सीएनजी वाहनांची ही मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कारमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट उपलब्ध करून देत आहेत. मात्र तुमच्या कारमध्ये सीएलजी किट नसल्यास तुम्ही ती बाजारातून बसवून देखील घेऊ शकताय
तुमच्याकडे पेट्रोल कार असेल आणि ती सीएनजी कारमध्ये बदलायची असेल, तर आफ्टर मार्केटमधून सीएनजी किट बसवूने शक्य आहे. बर्याच कंपन्या सरकारी प्रमाणित सीएनजी किट बनवतात, ज्यामुळे तुमची पेट्रोल कार सीएनजीमध्ये बदलू शकते. पेट्रोल कारचे CNG मध्ये रूपांतर केल्यास अनेक फायदे मिळतात.
सीएनजी वापरल्याने मायलेजसोबतच प्रदूषणही खूप कमी होते. गरज पडल्यास तुम्ही पेट्रोलवरही कार चालवू शकता. आज आपण सीएनजी किट कशी बसवायची आणि कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
सीएनजी किट बसवण्यापूर्वी कारमध्ये सीएनजी किट बसवणे योग्य आहे की नाही हे तपासावे. साधारणपणे जुन्या गाड्या सीएनजी किटशी सुसंगत नसतात. नवीन मॉडेल्स सीएनजीवर सहज धावू शकतात. सीएनजी किट बसवल्यानंतर विमा वैध राहील की नाही? याची देखील खात्री करून घ्यावी
सरकारकडून मान्यता घ्या
सीएनजी परिवर्तनासाठी तुम्हाला सरकारकडून मंजुरी घ्यावी लागेल. सीएनजी किटसाठी नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागेल. यामध्ये इंधनाचा प्रकार बदलण्यात येणार आहे. ही वेळ घेणारी प्रक्रिया असू शकते.
अधिकृत डीलरकडून सीएनजी किट खरेदी करा
नेहमी सरकारी अधिकृत डीलरकडून सीएनजी किट खरेदी करा. तसेच, तुम्ही खरेदी करत असलेले सीएनजी किट खरे असल्याची खात्री करा. सीएनजी किट खरेदी करणे खूप महाग असू शकते. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व सीएनजी किटच्या किमती तपासा.