काही सेकंदातच 100 किमीचा वेग, या कार तर एकदम ‘तुफानी’

| Updated on: Nov 12, 2023 | 3:09 PM

Cars under 15 Lakhs | जर तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंतची नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या तीन कारचा नक्की विचार करा. अगदी कमी वेळेत 0 ते 100 किमीचा वेग या कार पोहचतात. टॉप 3 मॉडल्समध्ये Skoda ते Honda पर्यंतच्या कारचा समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या कार आणि त्यांची मॉडल्स, किती आहे त्यांची किंमत?

काही सेकंदातच 100 किमीचा वेग, या कार तर एकदम तुफानी
Follow us on

नवी दिल्ली | 12 नोव्हेंबर 2023 : या दिवाळीत नवीन कार खरेदीचा विचार असेल तर या मग या तीन कारचा तुम्ही विचार करु शकता. अगदी कमी वेळेत या कार 100 किमी वेगाने धावू शकतात. त्यामुळे तुम्हाला स्पोर्ट कारचा फील आल्याशिवाय राहणार नाही. या कार काही सेकंदातच जणू हवेशी गप्पा मारतात. विशेष म्हणजे या तीन कार 15 लाख रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील. Skoda, Honda आणि Citroen या तीन कारचा यामध्ये समावेश आहे. या कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुम्ही या बजेटमध्ये कार खरेदीचा विचार करत असाल तर या तीन कारच्या खरेदीचा चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे.

8 ते 15 लाख किंमत

या सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करायची योजना आखत असाल तर या तीन कार तुमच्या दिमतीला येतील. तुमचे बजेट 8 ते 15 लाख असेल तर या तीन कार तुमच्यासाठीच आहेत. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे या कारच्या एक्सलेटरवर पाय ठेवताच त्या वाऱ्याशी गप्पा मारतील. तुम्हाला एखाद्या स्पोर्ट कारचा फील आल्याशिवाय राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

Skoda Slavia 1.5 TSI MT

स्कोडा कंपनीच्या या कारमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारमध्ये 6 स्पीड मॅनुअल गिअरबॉक्स आहेत. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे ही कार 15 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळेल. ही कार कमी वेळेत 100 किमीचा वेग गाठण्यात सक्षम आहे. खास गोष्ट म्हणजे ही कार केवळ 8.63 सेंकदात 100 किमीचा वेग पकडू शकते.

Skoda Slavia Price

या किंमतीत या कारचे एंट्री-लेवल व्हेरिएंट एंबिशन व्हेरिएंट मॉडेल 15 लाख 04 हजार (एक्स-शोरूम) किंमतीत मिळेल. या कारमधअये टॉप व्हेरिएंटची किंमत 17 लाख 72 हजार रुपये (एक्स-शोरूम) अशी आहे. ही कार पण वेगाने धावणारी आहे. ही कार कमी वेळेत 100 किमीचा वेग गाठण्यात सक्षम आहे.

Honda City MT: 10.2s

होंडाची ही सेडान कार 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह मिळेल. रिपोर्ट्सनुसार, ही कार केवळ 10.2 सेकंदात 100 किमीचा वेग गाठू शकते. त्यामुळे ही कार प्रेमींसाठी हा पण चांगला पर्याय आहे.ही कार कमी वेळेत 100 किमीचा वेग गाठण्यात सक्षम आहे.

Honda City Price

होंडा कंपनीच्या या सेडानच्या बेसिक मॉडेलची किंमत 9 लाख 50 हजार (एक्स-शोरूम) पासून सुरु होत आहे. 14 लाख 86 हजार रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) ही कार मिळते. ही कार पण वेगवान आहे. ही कार कमी वेळेत 100 किमीचा वेग गाठण्यात सक्षम आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे या कारच्या एक्सलेटरवर पाय ठेवताच त्या वाऱ्याशी गप्पा मारतील. तुम्हाला एखाद्या स्पोर्ट कारचा फील आल्याशिवाय राहणार नाही.

Citroen C3 Turbo Price

ही कार सर्वात किफायतशीर आहे. या कारची किंमत 8 लाख 28 हजार रुपयांपासून सुरु होते. ही कार 8 लाख 92 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स येतो. ही कार 10.72 सेंकदात 100 किमीचा वेग पकडते.