Tata Motors च्या या कारचा धुमाकूळ, झाली बंपर विक्री

| Updated on: Nov 10, 2023 | 3:53 PM

Tata Motors | भारतात टाटा मोटर्सची ही कार पसंतीला उतरली आहे. ग्राहकांनी दसऱ्याच्या अगोदरपासूनच या कारवर फिदा आहेत. आकडेवारीनुसार ऑक्टोबरपासून कारच्या विक्रीत मोठी उसळी आली आहे. ही एसयुव्ही कार त्या सेगमेंटमधील बेस्ट सेलर ठरली आहे. वर्षभरात या कारच्या विक्रीत 23 टक्के वाढ झाली आहे.

Tata Motors च्या या कारचा धुमाकूळ, झाली बंपर विक्री
Follow us on

नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : भारतात सध्या एसयुव्ही सेंगमेंट कारच्या जलवा आहे. यामध्ये टाटा मोटर्सची कॉम्पॅक्ट एसयुव्ही नेक्सॉने बाजारात धुमाकूळ घातला आहे. नेक्सॉनची सर्वाधिक विक्री होत आहे. सप्टेंबर महिन्यात नेक्सॉन फेसलिफ्ट लाँच झाली होती. आणि त्यानंतर या कारने मार्केट गाजवले. या कारचे जबरदस्त लूक आणि लेटेस्ट फीचर्स, सुरक्षा मानके पाहिले असता ही कार लोकप्रिय ठरली आहे. त्यात या कारला टाटाचा ब्रँड जोडल्या गेल्याने या कारवर ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. 4 मीटर कॉम्पक्ट एसयुव्ही कार सेंगमेटमध्ये मारुती सुझुकी आणि हुंडाई यांना या कारने आस्मान दाखवले आहे.

अशी झाली नेक्सॉनची जोरदार विक्री

ऑक्टोबर 2023 मध्ये टाटा नेक्सॉन विक्रीचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, दुसऱ्या महिन्यात नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात या कारच्या विक्रीत 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2022 मधील ऑक्टोबर महिन्यात टाटा मोटर्सने 13,767 नेक्सॉनची विक्री केली होती. यावर्षी हा आकडा 16,887 युनिटवर पोहचला. तर मासिक विक्रीची विचार करता सप्टेंबर 2023 मध्ये 15,325 टाटा नेक्सॉनची विक्री झाली. तर ऑक्टोबर महिन्यात या विक्री चार्टमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात नेक्सॉन एसयुव्हीची बंपर खरेदी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

क्रॅश टेस्टमध्ये पुढे

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स ही पहिली कंपनी आहे, जिने क्रॅश टेस्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे टाटाची सफारी आणि हॅरियर या दोन कार या चाचणीतील पहिले वाहन ठरु शकते. या दोन्ही एसयुव्हीला जागतिक NCAP क्रॅश टेस्ट देण्यात आले आहे. यामध्ये या कारला 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. याशिवाय मारुती सुझुकी, हुंदाई, महिंद्रा आणि महिंद्रा या कंपन्या पण या यादीत आहेत.

नेक्सॉनची किंमत आणि वैशिष्ट्ये

  • टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारच्या इंजिन पर्यायासह बाजारात
  • नेक्सॉन पेट्रोल व्हेरिएंट्सची एक्स शोरुम किंमत 8.10 लाख ते 14.70 लाख रुपये आहे
  • डिझेल व्हेरिएंट्स एक्स शोरुम किंमत 11 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांपर्यंत आहे
  • टाटा नेक्सॉनची इलेक्ट्रिक व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 14.74 लाख ते 19.94 लाख रुपये
  • नवीन टाटा नेक्सॉन मायलेजच्या बाबतीत जुन्या मॉडलपेक्षा सर्वात चांगली आहे
  • सेफ्टी फीचर्समुळे पण ही कार ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे