आजकाल लोकं केवळ प्रवासासाठी कार खरेदी करत नाहीत, तर कारचे तंत्रज्ञान आणि डिझाइन आणि फीचर्सकडेही लक्ष देत कार खरेदी करतात. इतकंच नाही तर आता लोकं सामान्य पेट्रोल-डिझेल गाड्यांना प्राधान्य न देता EVs (इलेक्ट्रिक व्हेइकल) कार घेण्यासाठी वळत आहेत. EVs कारची वाढती मागणी लक्षात घेता अनेक कार कंपन्याही आता या सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहेत. जर तुम्हालाही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी 15 लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या टॉप इलेक्ट्रिक कार घेऊन आलो आहोत. कोणत्या आहेत त्या कार चला जाणून घेऊयात.
टाटा पंच ईव्ही ही एक छोटी इलेक्ट्रिक SUV आहे, जी टाटा कंपनीच्या ICE व्हर्जनपेक्षा चांगल्या डिझाइनसह बाजारात आली आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरीचे दोन पर्याय दिले आहेत. ज्यात तुम्हाला 25 किलोवॅटची बॅटरी जी 315 किमीची रेंज देते आणि 35 किलोवॉटची बॅटरी जी 425 किमीची रेंज देते. यात 120 hp पॉवर आहे, जे केवळ 9.5 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. या कारमध्ये १०.२५ इंचाची ड्युअल स्क्रीन, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, तसेच यात ३६० डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट आणि एअर प्युरिफायर सारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
एमजी विंडसर ईव्ही ही इलेक्ट्रिक कार नुकतीच लाँच करण्यात आली असून ही कार भारतीय बाजारपेठेत ईव्ही विक्रीत अव्वल स्थानी आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या ईव्हीचा विक्रमही मोडलाआहे. या कारची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये असून बॅटरी रेंज 3.5 प्रति किलोमीटर आहे. विंडसर ईव्हीमध्ये 134 bhp पॉवर आणि 38 kWh बॅटरी आहे, जी 332 किमीची रेंज देते. या कारच्या वैशिष्ट्यांमध्ये फ्लश डोअर हँडल्स, लाइटेड लोगो आणि कनेक्टेड लाइट बार सारख्या प्रीमियम फीचर्सचा समावेश आहे.
सिट्रॉन ईसी 3 ही एक छोटी इलेक्ट्रिक SUV आहे, जी 29.2 kWh बॅटरीसह येते आणि एकदा चार्ज केल्यावर 320 किमीची रेंज देते. यात 57 hp ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी सिटी राइडसाठी परफेक्ट आहे. याचे डिझाईन अतिशय आकर्षक असून त्याचे इंटिरिअरही हायटेक आहे. याची एक्स शोरूम किंमत 12.76 लाख रुपये असून ही इलेक्ट्रिक कार फास्ट चार्जिंगला ही सपोर्ट करते.
Tata Nexon EV ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV आहे, ज्याची एक्स शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. यात 30.2 kWhची बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर ३२५ किमीपर्यंत रेंज देते. ड्युअल एअरबॅग्स, EBD सह ABS आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल सारख्या फीचर्ससह ही कार सुरक्षेच्या दृष्टीनेही उत्कृष्ट आहे. याशिवाय यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि इतर आरामदायक फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
MG ZS EV ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे, जी 50.3 kWh बॅटरीसह येते, जी सिंगल चार्जवर 461 किमीची रेंज देते. याची सुरुवातीची किंमत 13.99 लाख रुपये असून याची बॅटरी 4.5 रुपये प्रति किलोमीटर आहे. याच्या इंटिरियरमध्ये १०.१ इंचाचा टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ३६० डिग्री कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक कारची लांब रेंज आणि सुंदर डिझाइन हे लांब प्रवासासाठी तुमची एक उत्तम निवड ठरेल . या सर्व ईव्हीमध्ये प्रीमियम फीचर्स, लांब रेंज आणि उत्तम परफॉर्मन्स आहे, जे तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनाचा उत्तम अनुभव देऊ शकतात.