नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना मांडणारे स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी ड्रायव्हर लेस अशी 20 प्रवाशांची वाहतूक करणारी रोबोव्हॅन नावाची नवीन कारची संकल्पना मांडली आहे. रोबोव्हॅनमध्ये सामानासाठी देखील प्रशस्त जागा आहे. इलॉन मस्क यांनी रोबोव्हॅन आणि रोबो टॅक्सी तसेच इव्हेंटमध्ये एक रोबोट देखील लॉंच केला आहे.येणाऱ्या काळात ही तंत्रज्ञान वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती आणणार आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क जगासमोर ड्रायव्हर लेस रोबोटॅक्सी सादर केली आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात इलॉन मस्क एका रोबोटॅक्सीतून प्रवास करताना दिसत आहेत. इलॉन मस्क बसलेल्या रोबोटॅक्सचे दरवाजे आपोआप उघड बंद होतात.तसेच विना स्टिअरिंग व्हील आणि पॅडल शिवाय ही कार रस्त्यावर धावताना दिसत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
Robovan seats 20 & can be adapted to commercial or personal use – school bus, RV, cargo pic.twitter.com/CtjEfcaoHI
— Tesla (@Tesla) October 11, 2024
लॉस एंजिल्स मध्ये टेस्लाच्या रोबो इव्हेंटमध्ये इलॉन मस्क यांनी रोबो टॅक्सी तसेच रोबोव्हॅन देखील सादर केली आहे. येत्या काळात वाहतूक क्षेत्रात ही कार क्रांती आणू शकते. रोबोव्हॅनमध्ये सामान ठेवण्यासाठी जागा देखील दिली आहे. रोबोव्हॅन एक ऑटोनोमस व्हेईकल आहे. या रोबोव्हॅनची खास बाब म्हणजे यात एका वेळी 20 लोक बसू शकतात. मोठ्या प्रमाणात लगेज देखील ठेवू शकतात. रोबोव्हॅन यांची खाजगी वापरासाठी आणि सार्वजनिक वापाराशिवाय स्कूल बस, कार्गो आणि आरव्ही रुपात वापरता येऊ शकते.
रोबोव्हॅनचा लुक आणि फिचर्स खूपच भन्नाट आहेत, रोबोव्हॅन आणि रोबोटॅक्सी याच्या शिवाय या इव्हेटमध्ये एक रोबोट देखील लॉंच केला आहे. रोबोटॅक्सीत ड्रायव्हरची गरज नाही. यात एक छोटी केबिन देखील आहे. या रोबो टॅक्सीत दोन जण बसू शकतात. भविष्यातील कार कशी असणार या दृष्टीने तिचे डीझाईन केले आहे.आता केवळ यांचे प्रोटोटाईप लॉंच केले आहे. या रोबोटॅक्सीला मोबाईल फोनसारखे चार्जिंग देखील करता येते.