मुंबई : इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) बनविणार्या ओला इलेक्ट्रिकने ओला एस1 प्रोच्या (Ola S1 Pro) किंमतीत वाढ करुन ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता आपल्याला या स्कूटरची खरेदी करण्यासाठी दहा हजारांहून जास्तीची रक्कम खर्च करावी लागणार आहे. याआधी ओला एस1 प्रोची एक्सशोरुम किंमत FAME 2 सबसिडीला (subsidy) रद्द करुन 1.29 लाख रुपये केली होती. आता त्या किमतीला वाढवून 1.39 लाख रुपये करण्यात आले आहे. ओलाने अचानक आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत वाढ केल्याने ग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले होते. परंतु तरीही ओलाने ई-स्कूटरला बाजारात आणले होते. ओला एस1 प्रो ही भारतात सर्वाधिक विक्री होणारी ई-स्कूटर आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे सीईओने मार्चमध्येच इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती वाढविण्याचा इशारा दिला होता. त्या दरम्यान, सांगण्यात आले होते, की ई-स्कूटर खरेदीच्या पुढील टप्प्यामध्ये तिच्या किेमतीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यानंतर कंपनीने ओला एस1 प्रोची बुकिंग पुन्हा सुरु करताना किमत 10 हजार रुपयांनी वाढली आहे. तर दुसरीकडे लवकरच MoveOS 2 ओएसचे अपडेटेड व्हर्जनदेखील लवकरच रिलीज करण्यात येणार आहे.
दरम्यान, या निर्णयाचा सर्वाधिक झटका अशा ग्राहकांना बसलाय ज्यांनी या वर्षी जानेवारीत स्कूटरची बुकिंग केली होती. कंपनीच्या निर्णयानुसार, जानेवारीमध्ये बुकिंग करणार्या ग्राहकांनादेखील वाढीव किमतीनेच स्कूटरची खरेदी करावी लागणार आहे. प्रोडक्शन बंद करण्यात आल्याने ओलाने एस1ला बुकिंगपासून हटविण्यात आले आहे.
ओला एस1 प्रोच्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाल्यास, ही ई-स्कूटर एक व्हेरिएंट आणि दहा कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ओला एस1 प्रो कंपनीच्या एस1 मॉडेलचा प्रीमियम व्हेरिएंट आहे. एस1 प्रोची मोटर 5500 W ची पावर देते. युजर्सला एस1 प्रोचे दोन्ही व्हीलमध्ये डिस्कब्रेक मिळणार आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 155 किमी प्रतितास आहे. ओला एस1 प्रो ई-स्कूटर क्रूज कंट्रोल, हिल-होल्ड सिस्टम, व्हाईस असिस्ट आणि तीन राईडिंग मोड-नार्मल, सपोर्ट आणि हाईपरसह उपलब्ध आहे. फूल चार्ज केल्यावर एस1 प्रोची रेंज 181 किमी इतकी आहे.