मुंबई : ऑटोमोबाईल उद्योग संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (FADA) आकडेवारीवरून असं दिसून आलंय की गेल्या दोन वर्षांत सर्व क्षेत्रातील विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना (Corona) काळानंतर पहिल्यांदाच कारची (Car) विक्रीही जास्त आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनातील विक्री सध्या चांगल्या पातळीवर असल्याचा अंदाज आहे. एप्रिल 2022 मध्ये भारतात 2 लाख 64 हजार 342 प्रवासी चारचाकी वाहनांची विक्री झाली. कोरोना निर्बंध लागू असताना एप्रिल 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 2 लाख 10 हजार 682 कारच्या तुलनेत ही 25.47 टक्क्यांची लक्षणीय वाढ आहे.
उल्लेखनीय म्हणजे कोरोनाच्या येण्याआधी एप्रिल 2019 मध्ये विकल्या गेलेल्या 2 लाख 36 हजार 217 युनिटच्या तुलनेत ही 11.91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. FADA चं म्हणणं आहे की बहुतेक क्षेत्रे उघडल्यानं आणि संभाव्य खरेदीदार आता कामासाठी आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे विक्रीची ही वाढ आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्री नुकतीच जोर पकडण्याच्या बेतात आहे. यामुळे कार आणखी आकर्षक आणि चांगल्या होऊ लागल्या आहे. यामुळे विक्री देखील वाढते आहे.
ADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, “एप्रिल महिन्यात मार्च’22 प्रमाणेच ऑटो रिटेलचे आकडे पाहायला मिळाले. एप्रिल’21 ची वर्षभराची तुलना करताना सर्व प्रकारच्या गाड्यांचा अधिक वाढीचा दर मिळतो. हे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या की कोरोना लाटेच्या फेज 1 आणि 2 मुळे एप्रिल’21 आणि एप्रिल’20 दोन्ही देश लॉकडाऊनमुळे प्रभावित झाला होता. त्यामुळे त्यावेळी नगण्य व्यवसाय दिसून आला. त्यामुळे एप्रिल’19 ची चांगली तुलना होईल जी सामान्य प्री-कोरोना होती. एप्रिल ’22 आणि एप्रिल’19 ची तुलना दर्शवते की आम्ही अजूनही वाईट काळातून बाहेर नाही आहोत कारण एकूण किरकोळ विक्री वजा 6 टक्क्यांनी कमी झाली आहे.” मात्र, नजीकच्या काळात माफक प्रमाणात सुधारणा होण्याची आशा दिसून येते आहे.