मुंबई : एकीकडे इंधनाचे ( fuel ) वाढते दर आकाशाला भिडले असताना पारंपारिक इंधनाऐवजी पर्यायी इंधनावर संशोधन सुरू आहे. अशात वाहन कंपन्यांनी आता पेट्रोल आणि डीझेल ( diesel ) इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून सीएनजी, इलेक्ट्रीक, हायड्रोजन इंधनाचा चालणारी वाहने निर्माण करीत आहे. तर ब्रिटनच्या एका कंपनीने या सर्वांवर कडी करीत थेट गायीच्या शेणापासून चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की शेणापासून कसा काय ट्रॅक्टर धावणार परंतू हे खरे आहे. बेन्नामन ( Bennamann ) नावाची ही ब्रिटीश कंपनीने खत म्हणून वापरल्या जाणाऱ्या शेणापासून चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे.
शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा असा नव्या तंत्रज्ञानाचा ट्रॅक्टर ब्रिटनच्या एका कंपनीने तयार केला आहे. हा ट्रॅक्टर गायीच्या शेणापासून तयार झालेल्या इंधनावर चालणार आहे. या ट्रॅक्टरचे नाव न्यू हॉलंड टी – 17 असे ठेवण्यात आले आहे. शेणापासून चालणाऱ्या या ग्रीन ट्रॅक्टरला सीएनएचए इंडस्ट्रीयल नावाच्या अॅग्रीकल्चरल कंपनीने मिथेन एनर्जीचे प्रोडक्ट बनविणाऱ्या बेन्नामन ( Bennamann ) कंपनीशी करार करुन तयार केले आहे. न्यू हॉलंड टी – 17 हा ट्रॅक्टर 270 हॉर्स पॉवरचा असून तो गायीच्या शेणावर उत्तम रित्या चालतो.
हा ट्रॅक्टर कसे काम करतो
हा ट्रॅक्टर गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोमिथेम स्टोरेज युनिटमध्ये कलेक्ट करून काम करतो. गायचे शेण फ्यूजिटीव्ह मिथेनच्या रूपातील गॅस तयार करते. ज्याला एका प्रोसेसिंग युनिटमध्ये ट्रीट तसेच कम्प्रेस करून लो इमिशन फ्युएलमध्ये परावर्तित केले जाते. त्यासाठी यात क्रायोजेनिक टँकही लावण्यात आला आहे. ज्यात गायीच्या शेणापासून तयार होणारा बायो मिथेन – 162 डीग्रीवर ठेवला जातो. आणि तो ट्रॅक्टरला पॉवर देतो. त्याशिवाय क्रायोजेनिक टँकचा वापर करून मिथेनला डीझेलसमान वापरता येते.
शेणात सापडणारा फ्यूजिटीव मिथेन वायू बायो मिथेन इंधनात रूपांतरित करून सहज वापरता येतो.त्यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होणार आहे. यासोबतच प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे. ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने शेणात सापडलेल्या मिथेन वायूचा वापर केला आहे. आपण सीएनजीने वाहन चालवतो तसाच हा प्रकार आहे.
या ट्रॅक्टरची निर्मिती करणारी कॉर्निश कंपनी बेन्नामन गेल्या अनेक दशकांपासून बायो मिथेनवर संशोधन करीत आहे. हा ट्रॅक्टर कॉर्नवॉल येथील शेतात चाचणी म्हणून चालवला गेला. हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे आल्यास त्यांचा खर्चही कमी होईल आणि त्यासोबतच शेणाचा वेगळ्या पद्धतीने वापर करता येणार आहे.