मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना Fastag अनिवार्य केले आहे. याच्या अंमलबजावणीला आजपासून म्हणजेच 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. पण Fastag म्हणजे काय? तो कोणत्या गाड्यांना हवा, कसा बसवायचा? त्याची किंमत किती? हे आता आपण पाहूयात… (Fastag is Compulsory For All Vehicles Toll plaza)
वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.
जर आपल्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्या कलरची असेल तर तुम्हाला फास्ट टॅग बसवावाच लागेल. जर तुमच्या गाडीला फास्ट टॅग नसेल तर तुम्ही टोला प्लाझा क्रॉस करु शकत नाही. तसंच जर पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल तर ट्रक असो वा कॅब तुम्हाला Fastag बसवावाच लागेल. दुचाकींना मात्र फास्ट टॅगची काहीही गरज नसेल.
फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.
फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.
(Fastag is Compulsory For All Vehicles Toll plaza)
हे ही वाचा :
टोलनाक्यांवर Fastag बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल, आता तुम्हीच ठरवा काय करायचं…!