मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना Fastag अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी आजापासून म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. आज आज रात्री 12 वाजल्यापासून ही फास्ट टॅग अनिवार्य झालेली आहे. फास्ट टॅग नसेल तर उद्यापासून तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल. (Fastag will be mandatory from Today 15 Feb Nitin Gadkari)
याआधी 1 जानेवारीपासून फास्ट टॅग लागू करण्यात येणार होते मात्र सरकारने याची मुदत वाढवून 15 फेब्रुवारी केली होती. त्यामुळे आता इथून पुढे देशभरात टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम FASTag आवश्यक असेल. नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी तुम्हाला फास्ट टॅग जरुरी आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्ट टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ यामुळे आता वाचणार आहे.
एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टॅगचा हिस्सा सुमारे 75 ते 80 टक्के आहे जो सरकारला 100 टक्के करायचा आहे. यामुळे सरकार 15 फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.
जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.
वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.
फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.
फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.
टोल प्लाझावरुन जात असताना गाडीला फास्ट टॅग नसल्यास वाहनांना टोलवर थांबावं लागत होतं. यामध्ये टोल प्लाझावर ट्रॅफिम जॅम होण्याची अधिक शक्यता असे. मात्र आता तसं होणार नाही.
(Fastag will be mandatory from Today 15 Feb Nitin Gadkari)
हे ही वाचा :
वाहन चालक लक्ष द्या! ‘ही’ गोष्ट विसरलात तर टोल नाक्यावर नाही मिळणार एन्ट्री