मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : सध्या वाढत्या पेट्रोल दरामुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याकडे लागला आहे. कारण इलेक्ट्रीक वाहनामुळे मोठी बचत होते आहे. मात्र, इलेक्ट्रीक स्कूटरचे दर जादा असल्याने ग्राहकांना त्या खरेदी करण्याकडे फारसा रस दाखविलेला नाही. त्यामुळे तुम्ही जर इलेक्ट्रीक स्कूटर घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रीक स्कूटरचे दर कमी झाले आहेत. तर चला पाहूयात कोण-कोणत्या दूचाकी कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरचे भाव कमी केले आहेत.
इलेक्ट्रीक दूचाकी तयार करणारी प्रसिध्द कंपनी ओला सणासुदीच्या दिवसात आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरवर 24,000 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरसह ओला एस1 प्रो 2 झेनच्या बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी आणि ओला एस 1 एअरवर सूट मिळत आहे. तसेच वॉरंटी एक्सटेंशनची देखील भेट दिली आहे. तर जुन्या पेट्रोलच्या स्कूटरच्या बदल्यात ओला ई-स्कूटर खरेदीवर 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली आहे.
एथर एनर्जीने तिच्या संपूर्ण रेंजवर डिस्काऊंट जारी केले आहे. ज्यात 450 एस, 450 एक्स 2.9 kwh, 450 एक्स 3.7 इलेक्ट्रीक स्कूटरचा समावेश आहे. तसेच 450 एस इलेक्ट्रीक स्कूटरवर 5,000 रुपयांची सुट दिली आहे. तसेच 1500 रुपयांच्या कॉर्पोरेट बेनिफीटबरोबरच जुन्या स्कूटरच्या बदल्यात नवीन स्कूटरवर घसघशीत सूट आहे.
हीरो मोटोकॉर्प बाय नाऊ एण्ड पे इन 2024 ची ऑफर जारी केली आहे. ज्यासाठी कंपनी 6.99 टक्के इतके कमी व्याज आकारणार आहे. हे आधार बेस्ड लोन कॅश इएमआयने देखील चुकवाता येणार आहे. याशिवाय 3,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसची भेट दिली आहे.
फेस्टीव्ह सिझन पाहून 99,999 वाल्या जीटएक्सची विक्री 91,999 आणि 84,999 किंमतीच्या एस 1 ची विक्री 81,999 रुपयांना करीत आहे. याशिवाय प्रत्येक स्कूटरवर 10,000 रुपयांपर्यंत एक्सट्रा बेनिफिट दिले जात आहे.
बजाज आपल्या 2.9 kWh क्षमतेच्या बजाज चेतक इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री 1.15 लाख रुपये केली आहे. ही सूट केवळ स्टॉक संपेपर्यंत कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात आहे.