Video : ‘अटल सेतू’वर पहिला अपघात, पलटी खाऊन कारची डिव्हायडरला धडक, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 22, 2024 | 1:32 PM

‘अटल सेतू’ चे काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. नंतर हा सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र हा पूल सुरू  होऊन अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच त्यावर पहिला अपघात झाला.

Video : ‘अटल सेतू’वर पहिला अपघात, पलटी खाऊन कारची  डिव्हायडरला धडक, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई | 22 जानेवारी 2024 : मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज अर्थात ‘अटल सेतू’ चे काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 जानेवारीला हस्ते हे उद्घाटन पार पडले. त्यानंतर हा सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र हा पूल सुरू होऊन अवघे 10 दिवसही दिवस उलटत नाहीत तोच त्यावर पहिला अपघात झाला. ‘अटल सेतू’ वर एका कारचा भीषण अपघात झाला असून त्याचे थरारक व्हिज्युअल्स समोर आले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून ती उलटी-पालटी झाली आणि डिव्हायडरवर जोरात धडकली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितनाही झालेली नाही. पण या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या कारचालकांनी सावधानतेने गाडी चालवावी असा इशारा देण्यात येत आहे.

कसा झाला अपघात ?

अटल सेतूवर वाहने वेगाने धावत होती, तेव्हा एक चालक व्हिडीओ शूट करत होता. तेवढ्याच त्याच्या मागून डाव्या बाजूनने एक मारूती इग्निस कार वेगाने आली आणि भरधाव वेगाने पुढे गेली. मात्र कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस जाऊन डिव्हायडरला धडकली आणि तशीच पुढे जाऊन उलटी-पालटी झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण कारचे बरेच नुकसान झाले. हे शूटिंग करणारा चालक पुढे जाऊन हळूहळू थांबला आणि कारमधून उतरून अपघातग्रस्त कार चालकाला मदत करायला पोहोचला. या अपघाताचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

 

भूकंप रोधी डिझाइन

अटल सेतूवर अनेक उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शॉक ॲबझॉर्बर म्हणून काम करणाख्या आयसोलेशन बेअरिंगचा अटल सेतूवर वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे भूकंप झाला तरी हा पूल तुटणार नाही, फक्त थोडा हादरू शकतो. अटल सेतू बांधणाऱ्या अभियंत्यांच्या मते, या पुलाची रचना अशी आहे की तो रिश्टर स्केलवरील ६.५ तीव्रतेपर्यंतचे भूकंपाचे धक्के सहन करू शकतो.

इको फ्रेंडली लाइट

रात्रीच्या वेळी हायस्पीड ट्रॅफिकसाठी अटल सेतूवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अटल सेतूवर इको-फ्रेंडली दिवे म्हणजेच कमी उर्जेचे एलईडी दिवे वापरण्यात आले आहेत. ज्याचा वापर केल्याने पर्यावरणाची हानी होत नाही.

रिअल टाइम ट्रॅफिक इन्फॉर्मेशन डिस्प्ले

ड्रायव्हर्सना आजूबाजूच्या लेनमधील रहदारीची परिस्थिती आणि अपघातांची माहिती देण्यासाठी अटल सेतूवर रिअल टाइम ट्रॅफिक माहिती डिस्प्ले बसवण्यात आले आहेत. हे डिस्प्ले ठराविक अंतरावर बसवण्यात आले असून, तेथून वाहनचालकांना त्यांच्या प्रवासादरम्यान संपूर्ण पुलाची तत्काळ माहिती मिळेल.

अटल सेतू बनला पिकनिक स्पॉट

21.8 किलोमीटर लांबीचा हा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईला जोडतो.
या पुलाच्या उद्घाटनानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. बरेच लोक अटल सेतूवर गाड्या थांबवून व्हिडीओ आणि सेल्फी काढताना दिसत आहेत. जीवाची पर्वा न करताच रस्त्याच्या मधेच उभं राहून लोकं सेल्फी काढण्यात मग्न असल्याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे नेटकरी भडरकले आहेत. लोकांच्या सुविधेसाठी बनलेला हा पूल सेल्फी पॉईंट, पिकनीक पॉईंट बनल्याची टीका होत आहे.