Force Motors ने गुरखाचे नवीन टीझर आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी पाच दरवाजांची गुरखा तयार करण्याच्या प्रयत्नात होती. टीझरमध्ये गुरखाच्या 5 डोअरची झलक दिसून आली. या SUV शिवाय कंपनी लवकरच एक नवीन एसयुव्ही बाजारात उतरवणार आहे.
गुरखा 5 डोअर सोबतच कंपनी लवकरच गुरखा 3 डोअर कार पण लाँच करणार आहे. एप्रिल 2023 मधील नवीन एमिशन नियमानुसार, फोर्सने 3 दरवाजाच्या गुरखा कारचे उत्पादन बंद केले होते. पण नवीन टीझरनुसार, कंपनी 5 आणि 3 दरवाजांची गुरखा बाजारात उतरविण्याची योजना आखत आहे.
फोर्सने टीझरमध्ये 5 दरवाजांच्या मोठ्या गुरखा एसयुव्हीला दाखवले आहे. गुरखा 5 डोअरमध्ये 2,825mm लांबीचा व्हीलबेस पाहायला मिळू शकतो. तर एसयुव्ही 3 डोअर गुरखामध्ये टायरची लांबी 425mm मीटर असेल. याशिवाय नवीन एसयुव्हीला नवीन डिझाईनचे अलॉय व्हील मिळू शकते.
नवीन दमाच्या गुरखामध्ये मर्सिडीजचे 2.6 लिटरचे डिझेल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स असतील. गुरखा 5 डोअरमध्ये 5 सीटर (टू रो), 6 सीटर (थ्री रो) आणि 7 सीटर (दो कॅप्टन चेअरसह थ्रो रो) आसन व्यवस्थेचा पर्याय मिळू शकतो. 3 डोअर गुरखा केवळ 4 सीटर व्हर्जनमध्ये येईल.
गुरखा 5 डोअर आणि 3 डोअर येत्या काही आठवड्यात बाजारात दाखल करण्यात येईल. 3 डोअर गुरखाचा थेट सामना महिंद्रा थार सोबत होईल. तर 5 दरवाजांच्या गुरखाची टक्कर आगामी थार 5 डोअर आणि मारुती सुझुकी जिम्नी 5 डोअर सोबत होईल. गुरखा 3 डोअरची एक्स-शोरूम किंमत 15.10 लाख रुपये होती.