BMW कंपनीचे इलेक्ट्रिक स्कूटर या दिवशी येणार बाजारात, किंमत तर जाणून घ्या

| Updated on: Sep 29, 2024 | 9:06 AM

BMW CE 02 Launch Date Announced : देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर आल्यानंतर आता बीएमडब्ल्यू अजून एक इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल करत आहे. कंपनीने BMW CE 02 लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. किती आहे या ईव्हीची किंमत?

BMW कंपनीचे इलेक्ट्रिक स्कूटर या दिवशी येणार बाजारात, किंमत तर जाणून घ्या
BMW नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत तरी किती?
Follow us on

BMW ही जागतिक कंपनी भारतीय बाजारात तिची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. जर्मन ऑटोमेकर BMW CE 02 सह भारतात लाँच करणार आहे. बीएमडब्ल्यूची ही नवीन स्कूटर 1ऑक्टोबर रोजी बाजारात दाखल होईल. यापूर्वी या कंपनीने BMW CE 04 देशात सादर केली होती. बीएमडब्ल्यू CE 04 ही पूर्णपणे परदेशात तयार करण्यात आलेली स्कूटर आहे. तर आता नवीन येत असलेले इलेक्ट्रिक स्कूटर CE 02 देशातच तयार करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यूची भागीदार कंपनी TVS मदतीने ही इलेक्ट्रिक स्कूटर तयार करण्यात आली आहे.

BMW CE 02 चा स्टायलिश लूक

नवीन BMW CE 02 इलेक्ट्रिक पावरट्रेनसह स्कूटर आणि मोटारसायकल या दोघांना पण ऊर्जा देईल. या स्कूटरचे डिझाईन हे फ्यूचरिस्टीक आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक फ्लॅट सीट आहे. यामध्ये चंकी एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये समोरच्या बाजूला USD फॉर्क्सचा वापर करण्यात आला आहे. तर मागील बाजूला मोनोशॉर्क आहे.. या स्कूटरमध्ये 14-इंचाचे चाक देण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा

BMW स्कूटरला ऊर्जा

BMW CE 02 मध्ये दमदार PMS एअर-कूल्ड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या मोटरला बॅटरी पॅकचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या ईव्हीमध्ये 11 kW ची बॅटरी देण्यात आली आहे. त्यातून या स्कूटरला 7 bhp ची ऊर्जा मिळते. या बॅटरी पॉवरमुळे स्कूटर 95 kmph या अतिवेगाने धावू शकते. यामध्ये 4 kW ची बॅटरी पॅक देण्यात आली आहेर. त्याआधारे स्कूटरला 5.3 bhp शक्ती देण्यात आली आहे. त्यावर ही स्कूटर प्रति ताशी 45 किमी वेगाने धावते.

बीएमडब्ल्यूच्या स्कूटरची किंमत तरी किती?

जर्मन तंत्रज्ञानावर आधारीत बीएमडब्ल्यूच्या या इलेक्ट्रिक स्कूटर CE 02 ची किंमत किती याविषयी कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. या ईव्हीची किंमत यापूर्वीचे मॉडेल CE 04 पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे. BMW CE 02 भारतात तयार करण्यात आल्याने ही स्कूटर स्वस्त असण्याची शक्यता आहे. ही स्कूटर पाच लाख रुपयांच्या रेंजमध्ये येईल, असा अंदाज आहे. यापूर्वीची BMW CE 04 ही इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 14.90 लाख रुपये होती.