टाटा कार खरेदीवर बंपर बचत… हॅरियर, सफारी, टिगोर, टियागोवर आकर्षक डिस्काउंट ऑफर

| Updated on: Sep 06, 2022 | 6:18 PM

टाटा मोटर्सने सप्टेंबर महिन्यासाठी त्यांच्या अनेक मॉडेल्सवर दमदार डिस्काउंट ऑफर जारी केल्या आहेत. या महिन्यात तुम्ही टाटा हॅरियर, सफारी, टिगोर आणि टियागो खरेदी करून तब्बल 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. आगामी सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांना मोठ्या सवलतींचा लाभ मिळू शकतो.

टाटा कार खरेदीवर बंपर बचत... हॅरियर, सफारी, टिगोर, टियागोवर आकर्षक डिस्काउंट ऑफर
टाटा कार
Image Credit source: Social Media
Follow us on

देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) सप्टेंबर 2022 साठी टाटा कार्सच्या खरेदीवर मोठ्या डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. भारतीय ग्राहक सप्टेंबरमध्ये नवीन टाटा कार खरेदी करून तब्बल 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. सवलतीच्या ऑफरमध्ये टाटा हॅरियर, सफारी, टिगोर आणि टियागो कारचा समावेश आहे. आगामी सणासुदीच्या काळात ज्या ग्राहकांना नवीन कारची खरेदी करायची आहे, अशांसाठी टाटाच्या कार्सचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकांना सर्वात मोठी सूट टाटा हॅरियर (Tata Harrier) आणि सफारी एसयुव्ही (Safari SUV) वर मिळणार आहे. ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सारख्या फायद्यांचा समावेश आहे.

टाटा हॅरियर

हॅरियर एसयूव्ही खरेदीवर टाटा सर्वाधिक सूट देत आहे. भारतीय ग्राहक टाटा हॅरियर कार विकत घेतल्यावर एक्सचेंज बोनस 40,000 पर्यंत सूट घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहक नवीन एसयुव्ही खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील घेऊ शकतात. ही एसयूव्ही तिच्या स्पेस आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली जाते.

टाटा सफारी

एक्सचेंज बोनस म्हणून हॅरियर सारखी टाटा सफारी विकत घेतल्यावर 40,000 पर्यंत सूट मिळू शकते. दरम्यान, टाटा सफारीवर कॉर्पोरेट डिस्काउंट ऑफर असणार नाही. टाटा सफारीला देखील हॅरियरप्रमाणेच पॉवरट्रेन पर्याय मिळतात. त्याचबरोबर सफारीमध्ये थ्री-रो सीटचा फायदाही उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

टाटा टिगोर सीएनजी

टाटा टिगोरच्या सीएनजी व्हेरिएंटच्या खरेदीवरही सूट मिळेल. नवीन Tata Tigor CNG खरेदी केल्यास, एक्सचेंज बोनस म्हणून 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याच बरोबर ऑफरमध्ये 10,000 रुपयांपर्यंतची रोख सूट देखील समाविष्ट आहे. Tata Tigor CNG खरेदी केल्यावर ग्राहकांना एकूण 25,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

टाटा टियागो

Tata Tigor CNG प्रमाणे, Tata Tiago खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय Tiago च्या प्रत्येक व्हेरियंटवर 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. टियागोच्या प्रत्येक व्हेरिएंटवर 3,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे देखील उपलब्ध असतील. दरम्यान, Tiago CNG सवलतीच्या ऑफरमध्ये समावेशित नसेल.