मुंबई : इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खासकरून इलेक्ट्रीक दू-चाकी वाहनांना मोठी मागणी आहे. आता ज्यांनी अलिकडेच नविन इलेक्ट्रीक टू – व्हीलर ( electric two wheeler ) विकत घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण प्रमुख इलेक्ट्रीक दूचाकी वाहन निर्मात्या कंपन्यांना आपल्या ग्राहकांना रिफंड ( REFUND ) देणार आहेत. या इलेक्ट्रीक कंपन्यांनी ग्राहकांकडून वाहनांच्या चार्जरसाठी जादा रक्कम स्विकारली होती. त्याची परतफेड कंपन्या लवकरच ग्राहकांना करणार आहेत. ग्राहकांना एकूण 288 कोटी रूपयांचा रिफंड मिळणार आहे.
ओला इलेक्ट्रीकसह हीरो मोटोकॉर्प, एथर एनर्जी आणि टीव्हीएस मोटर कंपनी आदी कंपन्यांनी ईव्ही ऑफ-बोर्ड चार्जरकरीता ग्राहकांकडून जास्त रक्कम आकारली होती. ओला इलेक्ट्रीकने सोशल मिडीयावर घोषणा केली आहे. त्यात इलेक्ट्रीक टू- व्हीलर्स चार्जरसाठी आकारण्यात आलेली रक्कम परत केली जाईल असे म्हटले आहे. परंतू कंपनीने नेमकी किती रक्कम रिफंड केली जाणार आहे याचा खुलासा केलेला नाही. परंतू मिडीया आलेल्या एका अहवालानूसार ओला ग्राहकांना सुमारे 130 कोटी रुपये परत करणार आहे.
FAME 2 योजनेनूसार जी इलेक्ट्रीक दूचाकी वाहने 1.5 लाख रूपये ( एक्स शोरूम ) च्या रिटेल किंमतीत विकली जात आहेत, त्यांना केंद्राची 10,000 कोटी रूपयांच्या सबसिडी योजनेचा लाभास पात्र नाहीत. परंतू सबसिडी मिळवण्यासाठी या कंपन्या एक्स शोरूम किंमत कमी दाखविण्यासाठी आणि सबसिडी मिळण्यासाठी चार्जर आणि सॉफ्टवेअरचे स्वतंत्र बिल बनवित असल्याचे एमएचआयच्या तपासणीत आढळले.
मिंटने दिलेल्या वृत्तानूसार ओला इलेक्ट्रीक 130 कोटी, एथर एनर्जी सुमारे 140 कोटी, टीव्हीएस मोटर्स आपल्या iQube इलेक्ट्रीक स्कुटर खरेदी करणाऱ्यांना 15.61 कोटी, हीरो मोटोकॉर्प Vida V1 Plus च्या ग्राहकांना एकूण 2.23 कोटी रूपयांचा रिफंड आपल्या ग्राहकांना देईल. 12 एप्रिलपर्यंत विक्री झालेल्या वाहनांचा एथर एनर्जी रिफंड देईल. टीव्हीएस मोटर्स आणि मोटोकॉर्प मार्च 23 पर्यंत विकलेल्या वाहनांवर रिफंड देईल.
या प्रकारानंतर हीरो मोटोकॉर्पने आपल्या Vida V1 Plus आणि V1 Pro रेंजच्या ई-स्कूटरची किंमत एकदम कमी केली आहे. V1 Plus ची किंमत 25000 रूपयांनी तर pro ची किंमत 19000 रूपयांनी कमी केली आहे. आता त्यांची किंमत अनुक्रमे 1.2 लाख आणि 1.4 लाख रु. ( एक्स शोरूम )ने सुरू होत आहे. या किंमती आता फेम 2 सबसिडी आणि पोर्टेबल चार्जरचा समावेश आहे. जो आधी स्वतंत्रपणे विकला जात होता.