इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता राष्ट्रीय महामार्गावर ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करणार, एनएचएआयची योजना

| Updated on: Jun 30, 2021 | 6:21 PM

एनएचएआयने यापूर्वीच निवडलेल्या 650 साइटपैकी 138 साइटसाठी निविदा मागविल्या आहेत. या विकास प्रकल्पात मदत करण्यासाठी खासगी संस्थांकडून यापूर्वीच अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. (Good news for electric vehicle owners, NHAI plans to launch EV charging stations on national highways)

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता राष्ट्रीय महामार्गावर ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करणार, एनएचएआयची योजना
तुम्ही कार्यालायतून घरी आल्यानंतर कार चार्जिंग करायचा विचार करत असाल तर तुम्हाला वाट पहावी लागू शकते. 15 एमपीच्या एसी चार्जरने तुम्ही गाडी चार्ज करायला गेलात तर त्यासाठी नऊ तास लागतील. तर फास्ट डीसी चार्जरचा वापर केल्यास एका तासात 80 टक्के गाडी चार्ज होते. शेवटची 20 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो.
Follow us on

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा विचार करीत आहे. ही योजना देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर रियल इस्टेट विकासाचा भाग आहे. अहवालानुसार महामार्गाची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एनएचएआयने 22 राज्यात 650 मालमत्तांची ओळख करुन दिली आहे. (Good news for electric vehicle owners, NHAI plans to launch EV charging stations on national highways)

एनएचएआय पुढील पाच वर्षांत खासगी क्षेत्राच्या सहकार्याने विकास कार्यक्रमांची सुरूवात करेल. यात आगामी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गालगत 94 जागा, नवीन महामार्ग व निर्माणाधीन द्रुतगती महामार्गालगत 376 आणि देशभरातील महामार्गाच्या विद्यमान नेटवर्कच्या जवळपास 180 स्थळांची ओळख पटविण्यात आली आहे. एनएचएआयने यापूर्वीच निवडलेल्या 650 साइटपैकी 138 साइटसाठी निविदा मागविल्या आहेत. या विकास प्रकल्पात मदत करण्यासाठी खासगी संस्थांकडून यापूर्वीच अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहन धारकांना मदत मिळेल

राष्ट्रीय महामार्गांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित केल्याने इलेक्ट्रिक वाहन धारकांना बरीच मदत मिळेल. लाबंच्या प्रवासासाठी बॅटरीवर चालणाऱ्या कार वापरण्याच्या मर्यादांबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. सध्या इलेक्ट्रिक वाहन मालकांच्या गरजा भागविण्यासाठी महामार्गावर ईव्ही चार्जिंगची मोजकीच स्टेशन आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू केल्याने देशातील इलेक्ट्रिक वाहन संस्कृतीला चालना मिळण्यास मदत होईल. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, भारत लवकरच जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र होईल. या दशकाच्या अखेरीस भारताच्या सर्व व्यावसायिक कारपैकी 70 टक्के, खासगी कारपैकी 30 टक्के, बसपैकी 40 टक्के आणि दुचाकी आणि तीनचाकी वाहनांपैकी 80 टक्के इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

पुढील 9 वर्षात 30 लाख चार्जिंग स्टेशनची आवश्यकता

हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, पुढील नऊ वर्षांत भारताला सुमारे 30 लाख सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनचे जाळे आवश्यक आहे. महामार्गाच्या नेटवर्कसाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि त्यासंबंधित सेवा पुरवण्यावर सरकारचे लक्ष्य चांगले उत्पन्न मिळवून देण्याची अपेक्षा आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशनशिवाय एनएचएआय पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगत रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट, रिटेल आउटलेट्स यासारख्या व्यावसायिक जागेचीही योजना आखत आहे. (Good news for electric vehicle owners, NHAI plans to launch EV charging stations on national highways)

इतर बातम्या

Weather Report : राज्यात मान्सून कधी परतणार, हवामान विभागाचा नवा अंदाज, जून महिन्यात कुठं किती पाऊस झाला? वाचा सविस्तर

बुलडाण्यात एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिवीरचे डोस, लाईफलाईन हॉस्पिटल सील