देशातील प्रमुख कॅब टॅक्सी सेवा पुरविणारी कंपनी ओलाने गुगल मॅपला धक्का दिला आहे. कंपनीने गुगल मॅपला रामराम ठोकला आहे. कंपनीने गुगल मॅप्सचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी कंपनीने स्वतःचे ओला मॅप्सचा वापर सुरु केला आहे. कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सोशल नेटवर्किंग साईट X वर याविषयीची माहिती दिली. कंपनी पूर्णपणे गुगल मॅप सोडून आता नवीन ओला मॅपवर शिफ्ट झाली आहे. ही कंपनीची इन हाऊस मॅप सेवा आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये
भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर याविषयीची एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, “गेल्या महिन्यात Azure मधून बाहेर पडल्यानंतर आता आम्ही Google Maps ला पण अलविदा केले आहे. आम्ही वार्षिक 100 कोटी रुपये खर्च करत होतो. पण आता आम्ही या महिन्यापासून Ola Maps वर जाऊन हा खर्च शून्य रुपये केला आहे. तुमचे ओला ॲप चेक करा आणि गरज असेल तर ते अपडेट करा.”
अनेक लोकांना आम्ही गुगल मॅपवरुन ओला मॅपवर का शिफ्ट झालो, का स्थलांतरीत झालो याची उत्सुकता आहे. त्यांना याविषयीचे प्रश्न पडले आहेत. त्यांच्यासाठी एका आठड्यात एक सविस्तर माहिती देणारा लेख, ब्लॉग प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार असल्याची माहिती भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.
काय होणार बदल
कंपनी ओला मॅप्समध्ये स्ट्रीट व्ह्यू, न्यूरल रेडिएंस फील्ड्स, इनडोर इमेज, 3D मॅप्स आणि ड्रोन मॅप्स सारख्या सुविधा जोडण्यावर काम करत आहे. त्यांची सहकारी फर्म क्रुत्रिम AI द्वारे देण्यात येणाऱ्या क्लाउड सेवांमध्ये ओला मॅप्ससाठी ॲप्लिकेशन प्रोगामिंग इंटरफेस असेल. API एक प्रकारचा सॉफ्टवेअर इंटरफेस आहे. त्याचा वापर दोन वा त्यापेक्षा अधिक कम्युटर प्रोग्राम अथवा कंपोनेंट्स यांच्यामध्ये संवाद प्रणालीसाठी करण्यात येतो. ओलाने IT वर्कलोडला मायक्रोसॉफ्टच्या क्रुत्रिमच्या (Krutrim) क्लाऊडवर स्थलांतरीत केले आहे.