मुंबई : ADAS तंत्रज्ञानाचे भारतातही क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, भारतात हे तंत्रज्ञान अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पण, आता हळूहळू कार उत्पादकांनी त्यांच्या नवीन मॉडेल्समध्ये ते सादर करण्यास सुरुवात केली आहे. पण, ADAS (Technology) असल्यामुळे कारच्या किमतींवर परिणाम होतो, त्यामुळे किंमत वाढते. आज आम्ही तुम्हाला देशातील तीन सर्वात स्वस्त ADAS कारबद्दल सांगणार आहोत.
नवीन 2023 Honda City फेसलिफ्ट ही ADAS वैशिष्ट्यासह भारतातील सर्वात परवडणारी कार बनली आहे. Honda City (V variant) ची किंमत रु. 12.37 लाख (एक्स-शोरूम) आहे आणि ADAS मिळते. होंडा सिटीचा हा दुसरा बेस व्हेरिएंट आहे. त्याच्या ADAS मध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन, रोड डिपार्चर मिटिगेशन सिस्टीम आणि ऑटो हाय-बीम यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Hyundai ने नुकतीच नवीन-gen Verna लाँच केली आहे, ज्याला SmartSense ADAS तंत्रज्ञान देण्यात आले आहे. त्याच्या SX (O) वेरिएंटला ADAS मिळण्यास सुरुवात होते, किंमत 15.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अव्हायडन्स असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्मार्ट क्रूझ कंट्रोल आणि हाय बीम असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
त्यानंतर MG Astor येते. MG Astor च्या टॉप-स्पेक सॅव्ही प्रकारात ADAS लेव्हल-2 वैशिष्ट्ये आहेत, ज्याची किंमत रु. 16.79 लाख (एक्स-शोरूम) आहे. MG Astor च्या ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांचा समावेश आहे.
सर्वप्रथम, अॅडव्हांस ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) तंत्रज्ञान काय आहे हे जाणून घेऊया? असे मानले जाते की या तंत्रज्ञानामुळे मानवी चुकांमुळे होणारे वाहन अपघात मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. भविष्यातील मॉडेल्ससाठी स्वायत्त तंत्रज्ञानाच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणूनही रडार-आधारित तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. वास्तविक ही ADAS प्रणाली मल्टी व्हिजन-आधारित अल्गोरिदमवर कार्य करते जी आसपासच्या परिस्थितीवर आणि वातावरणावर आधारित असते आणि त्यानुसार ही प्रणाली काम करते.
सोप्या भाषेत सांगायचे तर, ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरला मदत करण्यासाठी ADAS सिस्टम प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि अशा प्रकारे ड्रायव्हरची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात. हे सिस्टम वाहनाच्या सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि नंतर ड्रायव्हरला माहिती देतात किंवा आवश्यकतेनुसार स्वतःहून कारवाई करतात.