सहा वर्षांपूर्वी भारतात प्रवेश करणारी फ्रान्सची कार कंपनी सिट्रोएनच्या कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. साल २०१९ मध्ये PSA ग्रुपने सीके बिर्ला ग्रुप सोबत जॉइंट व्हेंचर करीत भारतात सिट्रोएन ब्रँड लाँच केला होता. सिट्रोएन इंडिया कंपनी C5 एअरक्रॉस SUV, C3 आणि E-C3 चे उत्पादन करत आहे. ही कंपनी आपल्या कारची विक्री व्हावी यासाठी बंपर ऑफर देत आहे. सिट्रोएन कार्सवर सुमारे दोन लाखांपर्यंत सुट मिळत आहे.
जर तुम्ही मार्च महिन्यात कार खरेदी करण्याच्या विचारात आहात तर एक चांगली संधी तुमच्याकडे चालून आली आहे. फ्रान्सची कंपनी सिट्रोयन तिच्या कार्सवर पावणे दोन लाखापर्यंतचे डिस्काऊंट देत आहे. ही ऑफर केवळ ३१ मार्चपर्यंतच आहे. कंपनी तिच्या जुन्या गाड्यांचा स्टॉक क्लीअर करीत आहे.
सिट्रोएन इंडिया कंपनीने घोषणा केली आहे की त्यांच्या कार्सवर १.७५ लाख रुपयांपर्यंतचे बेनीफिट्स देत आहे. ही ऑफर केवळ ३१ मार्च २०२५ पर्यंतच व्हॅलीड आहे. सिट्रोएनच्या बेनिफिट्सची डिटेल्स माहीतीसाठी ग्राहक डिलरशिपकडे संपर्क करावा असे कंपनीने म्हटले आहे.
ही भारतीय बाजारात लाँच झालेली कंपनीची पहिली कार होती. ही एक हॅचबॅक कार असून तीन व्हेरिएंटमध्ये ती उपलब्ध आहे. यात लाईव्ह, फिल आणि शाईन अशा तीन व्हेरीएंटमध्ये ती उपलब्ध आहे. C3 ची किंमत ६.१६ लाख ते १०.१५ लाखाच्या दरम्यान आहे. दोन्ही किंमती एक्स शोरुम आहेत. ही नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन्स या टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनाने लेस आहे. बेस इंजिनाला ५ – स्पीड मॅन्युअर ट्रान्समिशन मिळते. तर टर्बो इंजिनाला ६ – स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स वा ६ – स्पीड टॉर्क कर्न्व्हर्टर ऑटोमेटीक युनिट मिळते. सध्या C3 कार एक लाख रुपयांच्या बेनिफिट्ससह उपलब्ध आहे.
Citroen eC3 च्या २३ मॉडेलवर ८० हजारापर्यंतचे फायदे मिळत आहेत. ही या ब्रँडची बाजारात विकली जाणारी एकमेव इलेक्ट्रीक कार आहे. याची किंमत १२.७६ लाख रुपयांपासून सुरु होते १३.४१ लाखांपर्यंत आहे. दोन्ही किंमती एक्स शोरुमच्या किंमती आहेत. Citroen eC3 दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.यात २९.२ kWh चा बॅटरी पॅक आहे. जो फ्रंट एक्सेलला लावलेल्या इलेक्ट्रीक मोटरला पॉवर देतो. हा ५६ बीएचपी चा कमाल पॉवर आणि १४३ Nm चा पीक टॉर्क देण्यात सक्षम आहे.
सिट्रोन एअरक्रॉस कारला १.७५ लाख रुपयांचा लाभ दिला जात आहे. जो २३ स्टॉकवर उपलब्ध आहे. एअरक्रॉसची किंमत ८.४९ लाख रुपये ते १४.५५ लाख रुपयांदरम्यान आहे. दोन्ही किंमती एक्स शोरुम्स किंमती आहेत. एसयुव्ही केवळ १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनासह उपलब्ध आहे. ही कार ६ – स्पीड मॅन्यु्अल गिअर बॉक्स वा ६ – स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटीक ट्रान्समिशनसह येते.
सिट्रोन बेसाल्ट भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त कूप एसयूव्ही आहे.या कारवर १.७० लाखांपर्यंतचे डिस्काऊंट आहे. ही केवळ २४ स्टॉकवरच उपलब्ध आहे. याची किंमत ८.२५ लाख ते १४ लाखांच्या आसपास आहे. दोन्ही किंमती एक्स शोरुम किंमती आहेत.