मुंबई : भारतीय बाजारात एकापेक्षा एक अशा सरस गाड्या लाँच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र अनेक पर्याय असले की संभ्रमावस्था निर्माण होते. असंच काहीसं ह्युंदाई आयोनिक 5 आणि किया इव्ही 6 बाबत झालं आहे. दोन्ही इलेक्ट्रिक गाड्या असून यापैकी कोणती गाडी निवडायची असा प्रश्न पडतो. या दोन्ही गाड्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. किया इव्ही 6 ही गाडी भारतात 2022 म्हणजेच गेल्यावर्षी लाँच करण्यात आली आहे. तर ह्युंदाईने आयोनिक 5 चं जानेवारी 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये लाँचिंक केलं. त्यामुळे या दोन्ही गाड्यांचा पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. दोन्ही गाड्यांची किंमत पाहिली तर ह्युंदाई आयोनिक 5 स्वस्त ठरते. ह्युंदाईने आयोनिक 5 च्या पहिल्या 500 बुकिंसाठीची किंमत 45 लाख रुपये ठेवली होती. त्यानंतर आता या गाडीची किंमत 46 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे. तर किया ईव्ही 6 ही ह्युंदाईच्या आयोनिक 5 पेक्षा महाग असून किंमत 61 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.
ह्युंदाई आणि किया दोन्ही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या ई-जीव्हीएम प्लॅटफॉर्मवर आधारीत आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्यांमुळे खूपच साम्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्युंदाई आयोनिक 5 मध्ये भारतात 72.6 किलोवॅटची बॅटरी आहे. तर 58 किलोवॅट बॅटरी असलेल्या गाडीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. एआरएआय चाचणीनुसरा ही गाडी पूर्ण चार्जवर 631 किमीची रेंज देते. दुसरीकडे किया इव्ही6 मध्ये 77.4 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी पूर्ण चार्जवर जवळपास 500 किमी अंतर कापते.
ह्युंदाई आयोनिक 5 ची लांबी 4635 मीमी, रुंदी 1883 मीमी, उंची 1600 मीमी आणि व्हीलबेस 3000 इतका आहे. तर किया इव्ही 6 ची लांबी 4681 मीमी, रुंदी 1879, उंची 1544 मीमी आणि व्हीलबेस 2900 मीमी इतका आहे. म्हणजेच ह्युंदाई आयोनिक 5 ही गाडी किया इव्ही 6 पेक्षा 60 मीमी लहान आहे.पण उंचीच्या आयोनिक 5 ही 55 मीमी जास्त आहे. कारण व्हिलबेस 100 मीमी जास्त असल्याने त्याचा फायदा उंचीत झाला आहे. डिझाईनच्या बाबतीत किया इव्ही 6 जास्त छान दिसते. दोन्ही मॉडेलमध्ये एलईडी लाईट्स वापरण्यात आले आहेत.
जवळपास दोन्ही गाड्यांमध्ये फीचर्स एकसारखेच आहेत. यामध्ये झिरो ग्रॅव्हिटी फ्रंट सीट, पॅनोरॅमिक सनरूफ, अँम्बियन्ट लायटिंग, वायरलेस फोन चार्जिंग आणि इतर अप्लायन्सेस चार्ज करण्यासाठी छोटं चार्जर आहे.आयोनिक 5 मध्ये 12.3 इंच डिजिटल कॉनसोल आणि 12.3 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. इव्ही 6 मध्ये कर्व्हड एचडी डिस्प्ले स्क्रिन इन्फोटेनमेंटसाठी आहे. त्याचबरोबर ड्रायव्हर डिस्प्ले देखील आहे.