नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : भारतीय बाजारात अनेक कारची मागणी आहे. प्रत्येक जण त्याच्या कम्फर्ट आणि बजेटनुसार कार खरेदी करतो. भारतात कार मार्केटमध्ये जायंट्स कंपन्या आहेत. सध्या या कारची पण मागणी वाढली आहे. कार खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. या कारची मागणी चांगलीच वाढली आहे. पेट्रोल इंजिन असलेल्या या कारवर ग्राहक फिदा आहेत. ही कार खरेदीसाठी सध्या 30 आठवड्यांचे वेटिंग (Car Waiting Period) करावे लागत आहे. तरीही बुकिंग काही थांबलेले नाही. ग्राहक हात धुवून ही खरेदीसाठी मागे लागले आहेत. असे काय खास आहे या कारमध्ये, कोणते फीचर आहेत.
30 आठवड्यांचे वेटिंग
हुंदाई वरना (Hyundai Verna) कारसाठी भोपाळ शहरात 30 आठवड्यांचे वेटिंग करावे लागत आहे. इतर शहरात पण या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही टाईमलाईन सर्वच व्हेरिएंटसाठी लागू आहे. यामध्ये EX, S, SX आणि SX(O) या कारचा समावेश आहे. या कारवर सातत्याने वेटिंग दिसून येत आहे. बुकिंगच सुरुच आहे. कार डिलिव्हरी सुरुच आहे. पण त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागत आहे.
काय आहे कारचे फीचर
नवीन दमाच्या वरना 1.2 लीटर, चार सिलेंडर, NA पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. या कारचे पॉवर आऊटपुट 113bhp आणि 144Nm टॉर्क आहे. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल युनिट आणि एक IVT युनिट आहे. याशिवाय एक नवीन 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. ते 158bhp आणि 253 Nm टॉर्क जेनरेट करण्यासाठी सक्षम आहे. ते 6 स्पीड मॅन्युअल युनिट वा 7-स्पीड DCT युनिटद्वारे चाकांना बळ देते.
इलेक्ट्रिक कार मैदानात
अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवणार आहेत. टाटा मोटर्सच नाही तर महिंद्रा अँड महिंद्रा, किआ मोटर्स, हुंदई मोटर आणि मारुती सुझुकी ईव्ही कार घेऊन येतील. टाटा हॅरियर ईव्ही, पंच ईव्ही, कर्व्ह ईव्ही, तर हुंदाई आयोनिक 6, किआ ईवी9, मारुती सुझुकी ईव्हीएक्स, महिंद्रा एक्सयूवी.ई8 सह 10 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक कार बाजारात येतील.