Hyundai च्या इलेकट्रीक कारमध्ये मिळणार सोफ्यासारखे सीट, सिंगल चार्जमध्ये चालेल 480 Km

| Updated on: Dec 10, 2022 | 12:29 PM

ह्युंदाईची नवीन इलेकट्रीक कार तिच्या सेगमेंटमध्ये विशेष असणार आहे, यामध्ये विशेष आकर्षण तिचे इंटेरियर असेल

Hyundai च्या इलेकट्रीक कारमध्ये मिळणार सोफ्यासारखे सीट, सिंगल चार्जमध्ये चालेल 480 Km
ह्युंदाई इलेकट्रीक कार
Image Credit source: Hyundai
Follow us on

मुंबई, दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Hyundai नवीन इलेक्ट्रिक कार Hyundai Ioniq 5 भारतीय बाजारात आणणार आहे. कोना इलेक्ट्रिकनंतर देशातील हे त्यांचे दुसरे इलेक्ट्रिक वाहन असेल. ही इलेक्ट्रिक कार इतर देनशमध्ये विकली जात आहे. दरम्यान, कंपनीने भारतात लॉन्च होण्यापूर्वी त्याचे टीझर रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. ताज्या टीझरमध्ये कंपनीने त्याच्या इंटीरियरची खासियत दाखवली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामध्ये अतिशय आरामदायी सीट्स देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे इंटिरिअरही कस्टमाईज करता येणार आहे.

असे असेल इलेक्ट्रिक कारचे इंटीरियर

टीझर व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की Ioniq 5 च्या पुढील भागात  ‘प्रीमियम रिलैक्सेशन सीट’ उपलब्ध होणार आहेत. सीटला लंबर सपोर्ट आणि रिक्लाइन फंक्शनसह इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट मिळते. याशिवाय यात रिलॅक्स बटण देखील आहे. इतकेच नाही तर सीटला स्लिम डिझाईन मिळते, ज्यामुळे केबिनमध्ये जास्त जागा दिसते.

मागील प्रवासी मागच्या बाजूला असलेल्या बटणाच्या साहाय्याने ड्रायव्हर सीट ऍडजेस करण्यास सक्षम असतील. यामुळे त्यांना पर्याप्त जागा वापरता येईल. सर्व आसनांसाठी मेमरी फंक्शन देखील आहे. याशिवाय सेंटर कन्सोल म्हणजे ड्राइव्हर आणि को-ड्रायव्हरच्या मधातला भाग  140 मिमी पर्यंत पुढे ढकलता येतो.

हे सुद्धा वाचा

20 डिसेंबरपासून सुरू होतेय बुकिंग

या इलेक्ट्रिक कारची बुकिंग 20 डिसेंबरपासून भारतात सुरू होणार आहे. हे कंपनीच्या ई-जीएमपी (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) नावाच्या नवीन ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये फुल चार्जमध्ये 480KM ची रेंज देण्याची क्षमता आहे. यामध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय दिले जाऊ शकतात. बॅटरी पॅक 350 kW DC फास्ट चार्जरद्वारे 18 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज केला जाऊ शकतो.