मुंबई : जर तुमची कार जास्त काळासाठी वापरात नसेल तर त्यात एसीमधील दुर्गंधीसह (Car Ac) अनेक समस्या दिसून येतात. तथापि, याची अनेक कारणे असू शकतात. पावसाळ्यात कीटक आणि उंदरांची संख्या वाढते. यामुळे हे देखील होऊ शकते. परंतू याबद्दल सजग राहणे आवश्यक आहे. कार चालू केल्यानंतर तुम्हाला दुर्गंधी येत असल्यास. मग सर्वप्रथम हा वास उंदराच्या मृत्यूचा आहे की बुरशीसारखा आहे की ओलसरपणाचा आहे हे ओळखावे लागेल. कारण तुमची कार जास्त वेळ उभी राहिल्यास काही वेळा एसीमधूनही दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच कार वापरात नसल्यास थोड्या थोड्या दिवसांनी एसी चालवण्याचा सल्ला दिला जातो. एसी सुरू केल्यानंतर काही कुजल्यासारखा वास येत असेल तर तुम्हाला गाडी मेकॅनिककडे घेऊन जावी लागेल.
तथापि, जर उंदीर मेल्याचा वास येत असेल तर तुम्ही स्वतः एकदा एसी फिल्टर देखील तपासू शकता. बहुतेक वाहनांमध्ये, ते सह-प्रवाशाच्या बाजूला डॅशबोर्डच्या खाली असते. यामध्ये उंदीर अडकल्याची शक्यता असते. जे तुम्ही स्वतः सहज दुरुस्त करू शकता. मात्र साफसफाई करूनही वास गेला नाही, तर मेकॅनिककडे जाण्याशिवाय पर्याय नाही. जर अशी परिस्थिती असेल, तर तुमच्या ओळखीचा एखादा चांगला मेकॅनिक असेल तरच त्याला दाखवा, नाहीतर गाडी शोरूममध्ये घेऊन जावी. जेणेकरून त्याची योग्य तपासणी होऊन या समस्येपासून सुटका मिळेल.
तुमच्या एसीमध्ये उंदीर किंवा तत्सम काहीतरी अडकल्याची खात्री झाल्यावर वास येत आहे. मग तुम्ही एसी सर्व्हिस करून घेतले तर बरे होईल, त्यामुळे तुमचा एसीही चांगले काम करू लागेल आणि दुर्गंधीची समस्याही संपेल. दुसरीकडे, जर तुम्हाला उंदीर तुमच्या गाडीला हानी पोहोचवू नयेत असे वाटत असेल, तर कारमध्ये कधीही खाणे-पिणे करू नका, तसेच खाण्याचे सामान कारमध्ये ठेवू नका. याशिवाय वाहनाची पार्किंग योग्य ठिकाणी करावी.