सध्या संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक गाडयांना मोठे प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे मोठंमोठ्या कंपन्या देखील भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहेत. यातच सर्वसामान्य माणसांचा इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे अधिक कल वाढत चालला आहे. या गरजा लक्षात घेता भारतीय बाजारपेठेत दोन दिवसात तब्बल 8 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आल्या आहेत. यामध्ये ओला इलेक्ट्रिकसह होंडा, रिव्हर आणि कोमाकीच्या मॉडेल्सचा समावेश आहे. या स्कूटर्सची किंमत 40,000 रुपयांपासून ते 1.43 लाख रुपयांपर्यंत आहे.
तुम्हाला देखील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचं असल्यास नुकत्याच लाँच आलेल्या या इलेक्ट्रिक दुचाकी बघू शकता. यात ओलाने इलेक्ट्रिक गिग, गिग प्लस, एस 1 झेड आणि एस 1 झेड प्लसच्या 4 मॉडेल्सचा समावेश करण्यात आलेला आहे. तर होंडाच्या ॲक्टिव्हा ई आणि क्यूसी 1 चा समावेश आहे. कोमाकीच्या एमजी प्रोमध्ये लिथियम स्कूटर आणि रिव्हर इंडीचा समावेश आहे. चला तर मग पाहूया या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्सचे फीचर्स आणि किंमती…
१. ओला Gig
या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 39,999 रुपये आहे. हि इलेक्ट्रिक स्कुटर शॉर्ट राइडसाठी डिझाइन करण्यात आली असून रिमूवेबल बॅटरी आणि मजबूत फ्रेमसह चांगली सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तुम्हाला या स्कूटरमध्ये १.५ किलोवॅट क्षमता असलेली रिमूवेबल बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, फुल चार्जवर ही स्कुटर तुम्हाला IDC-सर्टिफाइट नुसार ११२ किमीची रेंज देते. यात १ इंचाचे टायर बसवण्यात आले आहेत.
2. ओला Gig+
या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 49,999 रुपये आहे. लांबच्या प्रवासासाठी हि स्कुटर डिझाइन करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये १.५ किलोवॅट क्षमता असलेली रिमूवेबल सिंगल/डबल बॅटरी पॅक देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याची एका बॅटरीपासून 81 किमी रेंज देते आणि दोन बॅटरीपासून 157 किमी पर्यंत रेंज देते. यात १.५ किलोवॅटचे पीक आउटपुट असलेली हब मोटर देण्यात आली आहे. याची टॉप स्पीड ताशी ४५ किमी आहे.
3. ओला S1 Z
या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 59,999 रुपये आहे. तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १.५ किलोवॅट क्षमतेचा रिमूवेबल ड्युअल बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, तर हि स्कुटर एका बॅटरीपासून ७५ किमी रेंज देते आणि दोन बॅटरीपासून १४६ किमी पर्यंत रेंज देते. यात २.९ किलोवॅटचे पीक आउटपुट असलेली हब मोटर मिळते. ही इलेक्ट्रिक स्कुटर 4.8 सेकंदात 0-40 किमी प्रति तास वेग पकडू शकते. यात एलसीडी डिस्प्ले आणि फिजिकल की देण्यात आली आहे.
4. ओला S1 Z+
या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 64,999 रुपये आहे. या स्कूटरमध्ये १.५ किलोवॅट क्षमतेचा रिमूवेबल ड्युअल बॅटरी पॅक देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कुटर एका बॅटरीपासून ७५ किमी रेंज देते तर दोन बॅटरीपासून १४६ किमी पर्यंत रेंज देते. यात २.९ किलोवॅटचे पीक आउटपुट असलेली हब मोटर मिळते. ही कार 4.8 सेकंदात 0-40 किमी प्रति तास वेग पकडू शकते. याची टॉप स्पीड ७० किमी प्रति तास आहे. यात एलसीडी डिस्प्ले आणि फिजिकल की देखील देण्यात आली आहे.
5. होंडा ॲक्टिवा ई
होंडाने आपली ॲक्टिवा ई इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. यात १.५ किलोवॅट चा स्वॅपेबल ड्युअल बॅटरी सेटअप आहे. या दोन्ही बॅटरी फुल चार्जवर १०२ किमी रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या स्कुटरला बॅटरीमध्ये ६ किलोवॅट फिक्स मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतात, जे २२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात आयकॉन, स्टँडर्ड आणि स्पोर्ट असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. याची टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आहे. तर 7.3 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास वेग पकडू शकते. यात ७ इंचाची टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे जी स्क्रीन नेव्हिगेशनला सपोर्ट करते. अदयाप कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत १ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
6. होंडा QC1
होंडा कंपनीने QC1 ही इलेक्ट्रिक स्कूटरही लाँच केली असून हि स्कुटर सिंगल चार्जवर ८० किलोमीटरची रेंज देईल. तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर फिक्स्ड 1.5 kWh बॅटरी पॅकसह देण्यात येणार आहे. यात ७.० इंचाची टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे जी होंडा रोड सिंक देव ॲपसोबत रिअल टाइम कनेक्टिव्हिटी देते. यात 1.2 किलोवॅट (1.6 बीएचपी) आणि 1.8 किलोवॅट (2.4 बीएचपी) पॉवर आउटपुट देण्यात आलं आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला 0 ते 75% चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात. तर 6 तासात फुल चार्ज होते.
7. कोमाकी एमजी प्रो लिथियम सिरीज
इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी कोमाकीने एमजी प्रो लिथियम सीरिज स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात एमजी प्रो ली, एमजी प्रो व्ही आणि एमजी प्रो प्लसचा समावेश आहे. रेड, ग्रे, ब्लॅक आणि व्हाईट अशा चार कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 59,999 रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर ही १५० किमीची रेंज देते. यात ॲडव्हान्स रीजन, पार्किंग असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्स असिस्ट सह वायरलेस कंट्रोलसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. कोमाकी एमजी प्रो डिजिटल मॅट्रिक्स इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह वायरलेस अपडेट करण्यास सक्षम असणार आहे.
8. रिवर इंडी (River Indie)
बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक रिव्हरने त्यांची रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटर नवीन अपडेटसह बाजारात लाँच केली आहे. याशिवाय रिव्हरने इंडीमध्ये नवीन चेन ड्राइव्ह सिस्टीम आणि सिंगल स्पीड गिअरबॉक्ससह अपडेट केली आहे. आता यात रिव्हर्स स्विचही आहे. या सर्व बदलांसह याची किंमतही 18,000 रुपयांनी वाढवण्यात आली असून आता इंडीची किंमत 1.43 लाख रुपये करण्यात आली आहे.