हैदराबाद | 20 ऑक्टोबर 2023 : भारतातील तरुण जगाच्या स्पर्धेत कुठेच मागे नाहीत. आता लवकरच वाहतूक क्षेत्रात क्रांतीकारक तंत्रज्ञान दाखल होणार आहे. आयआयटी हैदराबादने ( IIT Hyderabad ) देशातील पहिली ड्रायव्हर लेस ( Driverless ) इलेक्ट्रीक कार तयार केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही कार विद्यार्थी आणि प्रोफेसरना कॅंपसमध्ये ने-आण करण्याचे काम आरामात करीत आहे. या कारची अशाप्रकारे टेस्टींग सुरु असून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देखील तिच्यातून प्रवासाचा आनंद लुटला आहे.
चार चाकांच्या या क्लोज्ड इलेक्ट्रीक कारला हैदराबाद आयआयटीच्या TiHAN सेंटरने विकसित केले आहे. ही गाडी जुन्या पार्टपासून तयार करण्यात आली आहे. आयआयटीचे TiHAN सेंटर पहिले स्वायत्त नेव्हीगेशन टेस्टबेड ( एरियल टेरेस्ट्रियल ) फॅक्ट्री आहे. या TiHAN सेंटरने दोन गाड्या विकसित केल्या आहेत. त्यांची एक वर्ष कॅंपसमध्ये चाचणी घेण्यात येत आहे.
या शटल कारला वेगवेगळ्या प्रकारचे सेंसर लावण्यात आले आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. चाचणीसाठी तिला अधिक वेळा चालवून पाहण्यात येत आहे. यात LiDAR आधारित नेव्हीगेशन सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. ड्रायव्हर लेस कारचे हे मॉडेल देशातील पहिले देशी तंत्रज्ञान आहे.
प्रोफेसर राजलक्ष्मी यांनी सांगितले की यासाठी डाटा जमा करण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफीकमध्ये वाहनांना तैनात केले होते. या डाटाचा वापर बॅकग्राऊंड रिसर्चसाठी ड्रायव्हरलेस कारना तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. आणखी काही प्रोटोटाईप तयार केले असून ते विविध टप्प्यात आहेत. त्यांच्या टेस्टींगचे काम सुरु आहे.
हे सेंटर अनेक प्रकारच्या ऑटोमेटेड व्हेईकल तयार करीत आहे. यात एरियल, मल्टीटेरेन आणि जमीन खणणाऱ्या व्हेइकलटचा समावेश आहे. हे सेंटर देशाच्या पॉलिसी फ्रेमवर्कच्या दिशेत काम करीत आहे. अशा शटल कार वेअरहाऊस, कॅंपस आणि एअरपोर्ट सारख्या नियंत्रित वातावरणात उपयोगी ठरु शकणार आहेत.