मुंबई : महामार्गावरील अपघाताचे प्रमाण दिवसोंदिवस वाढतच आहे. या अपघातामध्ये चालकाची चुक असल्याचे बऱ्याचदा समोर आले आहे. वाहन चालवताना नेहमीच अत्यंत सावध राहण्याची गरज असते (Highway car driving tips). विशेषत: हायवेवर वाहन चालवताना ते अधिक महत्त्वाचे असते, कारण रिकामे आणि चांगले रस्ते पाहून लोकांना भरधाव वेगाने गाडी चालवायची इच्छा होते आणि हे कधी कधी मोठ्या अपघाताचे कारण बनते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे सांगणार आहोत.
हायवेवर गाडी चालवताना, तुमचा वेग वारंवार बदलणे टाळा आणि सुरक्षीत एकसमान वेगाने गाडी चालवा. जेणेकरुन वाहन नेहमी तुमच्या नियंत्रणात असेल आणि तुम्ही कोणत्याही अपघातापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल.
महामार्गावर वारंवार लेन बदलल्याने तुम्हाला तसेच इतर वाहनांना अपघाताचा धोका असतो, त्यामुळे निश्चित लेन निवडा आणि अगदी आवश्यक असल्याशिवाय लेन बदलू नका.
केवळ महामार्गावरच नाही तर प्रत्येक प्रकारच्या रस्त्यावर तुम्ही समोरच्या वाहनापासून योग्य अंतर राखले पाहिजे, जेणेकरुन समोरच्या वाहनाने ब्रेक लावला की तुम्हाला सावरण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमचे वाहन योग्य वेळी थांबवू शकाल.
महामार्गावर किंवा इतर कोणत्याही रस्त्यावर वाहन ओव्हरटेक करताना, मागून दुसरे कोणतेही वाहन भरधाव वेगाने येत नाही याची काळजी घ्या. कारण ओव्हरटेकिंगच्या वेळी लोक अनेकदा ही चूक करतात.
वाहन चालवताना नेहमी योग्य इंडिकेटरचा योग्य वेळी वापर करा, जेणेकरून तुमच्या आजूबाजूच्या वाहनांना तुमचा सिग्नल समजून घेण्याची संधी मिळेल.
वाहन चालवताना साइड मिरर आणि बॅक मिररवरही सतत लक्ष ठेवावे, यामुळे इतर वाहनांसोबत होणारे अपघात टाळता येतील.
महामार्गावरील लांबच्या प्रवासात सतत वाहन चालवल्याने बसून शरीर थकते, त्यामुळे झोप येण्याची शक्यता असते, जेव्हाही तुम्ही लांब पल्ल्याचे वाहन चालवता तेव्हा थोड्या अंतराने ब्रेक घेत राहावा.