मुंबई : इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे बाजारात अनेक गाड्या महाग झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही मोठा फटका बसत आहे. एप्रिल महिन्यापासून अनेक वाहन कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. किआ ही त्यापैकी एक कंपनी आहे. किया इंडियाने (Kia India) अलीकडेच थ्री रो ऑफरिंग केरेन्सची (Kia Carens) किंमत वाढवली आहे. कार निर्मात्या कंपनीने अधिकृतपणे कोणतीही भाडेवाढ जाहीर केली नसली तरी, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आता केरेन्सच्या अपडेटेड किंमती पाहायला मिळत आहेत. Kia Carens ही कंपनीची एक प्रीमियम SUV कार आहे ज्यामध्ये थ्री रो सीटिंग अरेंजमेंट पाहायला मिळते. ही कार काही आठवड्यांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. या कारची किंमत (Kia Carens Price Hike) 20,000 ते 70,000 रुपयांनी (एक्स-शोरूम) वाढवण्यात आली आहे.
या कारच्या बेस व्हेरिएंटच्या (या व्हेरिएंटला प्रीमियम मॉडेल म्हटलं जातं) किंमतीत आता 60,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता 9.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतील. 16.19 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आलेल्या Luxury Plus 7 व्हेरिएंटसाठी ग्राहकांना आता 16.59 लाख (एक्स-शोरूम) मोजावे लागतील. या मॉडेलची अपडेटेड किंमत 40,000 रुपयांने वाढली आहे.
1.4 लीटर पेट्रोल 7-स्पीड DCT लक्झरी प्लस 6 सीटरसह सुसज्ज असलेल्या कारच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत आता 17.44 लाखांपासून सुरू होईल, तर त्याच-स्पेक व्हेरिएंटच्या सात-सीटर व्हर्जनची किंमत 17.49 लाख रुपये इतकी असेल. टॉप-स्पेक पेट्रोल व्हेरिएंट सुरुवातीला 16.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आलं होतं. टॉप-स्पेक 1.5 लीटर डिझेल व्हेरियंट, जे त्याच किमतीत लॉन्च केलं होतं, याच्या सहा-सीटर व्हेरिएंटसाठी आता ग्राहकांना 65,000 रुपये अधिक आणि सात-सीटर व्हेरिएंटसाठी 70,000 रुपये अधिक खर्च करावे लागतील.
Kia ने अलीकडेच घोषणा केली आहे की या वर्षी 14 जानेवारी रोजी बुकिंग्स सुरु झाल्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या कारने 50,000 युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. लक्झरी आणि लक्झरी प्लस व्हेरियंट हे 45% बुकिंग योगदानासह लोकप्रिय पर्याय आहेत. दरम्यान, कंपनीने मार्चमध्ये 7,000 युनिट्सची विक्री केली आहे.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स