मुंबई : किया मोटर्स इंडियाने (Kia Motors India) भारतीय बाजारात दोन लाखांपेक्षा जास्त कार्सची विक्री करुन एक नवा इतिहास रचला आहे. किया मोटर्स इंडिया कंपनीने 17 महिन्यांपूर्वी भारतात विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर खूपच कमी कालावधीत कंपनीने भारतात कार्सची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. इतक्या कमी वेळात इतकं मोठं यश मिळवणारी किया भारतातील पहिलीच ऑटोमोबाईल कंपनी ठरली आहे. (Kia Motors India sold over 2 lakh cars in just 17 months)
किआने गेल्या 6 महिन्यांमध्ये एक लाखांहून अधिक वाहनांची विक्री केली आहे. कियाच्या विक्रीपैकी 60 टक्के हिस्सा हा कार्निवालचं लिमोजिन वेरिएंट, सेल्टॉस आणि सोनेट या टॉप कार्सचा आहे. कंपनीने नुकतीच एक प्रेस नोट जारी केली आहे, त्यात कंपनीने म्हटलं आहे की, देशात विक्री होणाऱ्या प्रत्येक दोन पैकी एक कार ही यूव्हीओ तंत्रज्ञानाशी जोडलेली एक कनेक्टेड कार आहे. आमच्या कंपनीने 1,06,000 कनेक्टेड व्हीकल्सची विक्री केली आहे.
दर तीन मिनिटात एका Kia Sonet ची विक्री
किया मोटर्स ने 2019 मध्ये भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय ग्राहकांकडून कियाच्या वाहनांना चांगलीच पसंती मिळत आहे. किया कंपनीची कार किया सॉनेटच्या विक्रीतही मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. भारतीय ग्राहकांकडून या कारला खूप पसंती मिळत आहे. Kia Motors ने दावा केला आहे की, भारतात सरासरी दर तीन मिनिटांमध्ये एक Kia Sonet कार विकली जात आहे.
कियाची सोनेट ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. तसेच कियाची सेल्टोस (किया कंपनीचं भारतातील पहिलं प्रोडक्ट) ही कारदेखील एसयूव्ही सेगमेंटमध्ये विक्रीच्या बाबतीत टॉपला आहे. दरम्यान, भारतीय बाजारात जितक्या कनेक्टेड कार विकल्या जात आहे, त्यापैकी 55% हिस्सा हा किआ कंपनीचा आहे. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांची Seltos GTX Plus DCT 1.4 टर्बो मॉडल ही देशात सर्वाधिक विक्री होणारी कनेक्टेड कार आहे.
नवीन Kia Sonet चं इंजिन आणि फिचर्स
या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये रिफाइन्ड 1.5 CRDi डिझेल इंजिन देण्यात आलं आहे, जे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 100 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. तर दुसरं इंजिन 115 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. सोबतच यामध्ये G1.0 T-GDi पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे 120 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. हे इंजिन 6iMT आणि 7DCT स्मार्टस्ट्रीमसह देण्यात आलं आहे.
मायलेज आणि स्पीड
7DCT सह किया सोनेटचं मायलेज 18.3 किलोमीटर प्रति लीटर इतकं आहे. iMT सह किया सोनेटचं मायलेज 18.2 किलोमीटर प्रति लीटर इतकं आहे. 6MT डिझेल सोनेट 24.1 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर 6AT सोनेट 19 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.
या कारमध्ये तुम्हाला इमरजन्सी स्टॉप सिग्नल, रियर पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, डुअल एयरबॅग्स आणि ईबीडीसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. किआ सोनेटमध्ये तुम्हाला 10.67cm कलर कलस्टर आणि 26.03cm टचस्क्रीन, स्मार्ट प्युअर एयर प्युरिफायरसह व्हायरस प्रोटेक्शन, फ्रंट वेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स आणि एमटी रिमोट इंजिन स्टार्टसारखे अनेक फिचर्स मिळतील. या कारची एक्स शोरुम किंमत 6.71 लाख ते 11.99 लाख रुपयांपर्यंत आहे.
एका महिन्यात किया सोनेटच्या 11,721 युनिट्सची विक्री
किआ मोटर्स इंडियाने (Kia Motors India) काही दिवसांपूर्वी त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet लाँच केली होती. या एसयूव्हीला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ही कार भारतीय नागरिकांच्या पसंतीस उतरली असल्याचे पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात या कारच्या तब्बल 11 हजार 721 युनिट्सची विक्री झाली आहे.
कंपनीने याबाबत म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात आमच्या 21 हजार 21 कार्सची विक्री झाली आहे. त्यामध्ये किया सोनेटचे 11,721 युनिट्स. किया सेल्टॉसचे 8,900 युनिट्स आणि कार्निव्हलच्या 400 युनिट्सचा समावेश आहे. कंपनीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये ऑटो सेक्टरमध्ये मोठी मरगळ आली होती. परंतु सणासुदीचा मुहूर्त साधून लोकांनी मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केल्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य पाहायला मिळत आहे. Kia Motors ने म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरात दर तीन मिनिटाला सरासरी एका कारची विक्री झाली आहे.
हेही वाचा
भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा
Kia Motors च्या ‘या’ कारची मार्केटमध्ये धुम, एका महिन्यात 11,721 युनिट्सची विक्री
ठरलं! 11 नोव्हेंबरला नवी Kia Sonet लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
REPUBLIC DAY 2021 : निसानकडून आज तब्बल 720 Magnite कार्सची रेकॉर्डब्रेक डिलीव्हरी
(Kia Motors India sold over 2 lakh cars in just 17 months)