Electric Bus | पुण्यातील बाणेर आगारातील इलेक्ट्रीक बस ओलेक्ट्रा कंपनीच्या! या बसची खासियत जाणून घ्या

| Updated on: Mar 06, 2022 | 7:23 PM

फक्त वायू प्रदूषणच नव्हे तर ध्वनी प्रदूषणही या बसमुळे कमी होतं. ओलेक्ट्राचा या बस एसी आहे. 33 प्रवासी या बसमधून प्रवास करु शकतात. या बस इलेक्ट्रॉनिक एअर सस्पेंशन असल्यामुळे या बसचा प्रवास अधिक सुखकर होतो.

Electric Bus | पुण्यातील बाणेर आगारातील इलेक्ट्रीक बस ओलेक्ट्रा कंपनीच्या! या बसची खासियत जाणून घ्या
हीच ती Electric बस, जी देणार पुणेकरांना सेवा!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : पुणे मेट्रोसोबतच आज इलेक्ट्रीस बसही (PMPML Electric Bus) पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आधीपासूनच पुण्यात असलेल्या इलेक्ट्रीक बसच्या संख्येत आज आणखी भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोसोबत (Pune Metro) इलेक्टीक बस आणि चार्चिंग स्टेटशनचंही उद्घाटन केलं. त्यामुळे पुणे शहरातील इलेक्ट्रीक बसचा ताफा आता 300 पर्यंत विस्तारला आहे. एककीडे देशात ग्रीन फ्युएलला चालना आणि प्रोत्साहन द्यायला हवं, या दृष्टीनं भारत सरकार प्रयत्न करतंय. अशातच आता पुणेकरांच्या सेवेत असलेल्या इलेक्ट्रीक बसची संख्याही वाढली आहे. ओलेक्ट्रा नावाच्या कंपनीच्या दीडशे बस आणि चार्जिंग स्टेशनचं आज उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यातील एव्ही ट्रान्सता ताफा वाढला आहे. ऑलेक्ट्राकडे (Olectra Electric Bus) भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रीक बसचा ताफा असून ही कंपनी इलेक्ट्रकी मोबिलिटीमध्ये अग्रेसर कंपनी म्हणून ओळखली जाते. पुण्यात दीडशे इलेक्ट्रीक बसचं यशस्वी संचालन करण्यात आलं आहे.

पुण्यातच नव्हे तर इथेही  ऑलेक्ट्राची इलेक्ट्रीक बस

सध्या पुण्यात 150 बस ऑलेक्ट्रा यशस्वीपणे चालवते आहे. ऑलेक्ट्रा सुरत, मुंबई, पुणे, सिल्वासा, गोवा, नागपूर, हैदराबाद आणि डेहराडून इथंही इलेक्ट्रिक बसचा ताफा यशस्वीपणे चालवतेय. नवीन 150 इलेक्ट्रिक बसेसची भर पडल्याने पुणे शहरातील नागरिकांच्या वातानुकूलित, आरामदायी प्रवासाच्या अनुभवात आता वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. प्रदूषणामुक्तीसाठी या इलेक्ट्रीक बस महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगितलं जातं. या बसेसमुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल, असं बोललं जातंय. या बसेस 100 टक्के इलेक्ट्रिक असल्याने शून्य उत्सर्जन आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत.

काय आहे खासियत?

सकारात्मक प्रतिसाद पाहता या बसची कार्यक्षमता आणि बसचा ताफा फक्त पुण्यातच नव्हे तर गोव्यासह सिल्वासा, मुंबई आणि सुरतमध्ये वाढेल, अशी शक्यता आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. के.व्ही. प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ओलेक्ट्रा बसने दोन कोटी किलोमीटरहून अधिकचा प्रवास केला आहे.

फक्त वायू प्रदूषणच नव्हे तर ध्वनी प्रदूषणही या बसमुळे कमी होतं. ओलेक्ट्राचा या बस एसी आहे. 33 प्रवासी या बसमधून प्रवास करु शकतात. या बस इलेक्ट्रॉनिक एअर सस्पेंशन असल्यामुळे या बसचा प्रवास अधिक सुखकर होतो. तसंच या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरो, प्रत्येक बससाठी एक इमरजन्सी बटण आणि यूएसबी सॉकेट्सही आहे.

एका चार्जमध्ये किती चालते?

एकदा चार्ज केल्यानंतर ही बस तब्बल दोनशे किमी प्रवास करु शकते. तसंच हाय पॉवर एसी आणि डिसी चार्जिंग सिस्टमवर या बसची बॅटरी तीन ते चार तासांत पूर्णपणे चार्ज होते. 2000 मध्ये स्थापण्यात आलेल्या Olectra Greentech Limited ही कंपनी MEIL समूहाचा एक भाग आहे. 2015 मध्ये भारतात या कंपनीनं इलेक्ट्रीक बसचं उत्पादन करण्यास सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या :

बाईक म्हटलं की पेट्रोलची कटकट, आता इलेक्ट्रिक स्कूटरचीही वटवट, लवकरच ‘भाव खाणार’

Jeep ची इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास

तुमच्या सोसायट्यांमध्येच Electric Car चार्ज करा, MG Motor इलेक्ट्रिक चार्जर्स इन्स्टॉल करणार