मुंबई : भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दुचाकींची (Electric Two Wheeler) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहता अनेक कंपन्या आपली उत्पादने बाजारात आणत आहेत. अशा परिस्थितीत ऑटो कंपनी कोमाकीने (Komaki) नुकतीच स्वतःची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Komaki Electric Scooter) सादर केली आहे. कोमाकीने सादर केलेल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव कोमाकी डीटी 3000 (Komaki DT 3000) असं आहे. भारतात या स्कूटरची किंमत 1,15,000 रुपयांपासून सुरू होते. नवीन स्कूटर बाजारात सध्याच्या स्पर्धकांना जोरदार टक्कर देईल असा कंपनीला विश्वास आहे. Komaki DT3000 ई-स्कूटर शुक्रवारपासून देशातील सर्व Komaki डीलरशिपवर उपलब्ध असेल.
या वर्षी आत्तापर्यंत, Komaki ने लेटेस्ट DT3000 सह एकूण तीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. यापूर्वी कंपनीच्या दुचाकी रेंजर आणि व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटर खूप लोकप्रिय झाल्या होत्या. या नवीन Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन मोटर्स देण्यात आल्या आहेत. 3000 वॅट BLDC मोटर तसेच 72 V52 AH बॅटरी देण्यात आली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, DT 3000 इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 180-220 किमीची रेंज देते. तसेच या ई-स्कूटरचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रतितास इतका असल्याचा कंपनीचा दावा आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास कोमाकीने अद्याप या स्कूटरचा एकही फोटो जारी केलेला नाही. यासाठी इच्छुक ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊ शकतात. स्कूटर लवकरच ऑनलाइन सादर केली जाईल.
कोमाकी इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा म्हणाले, “अनेक विंटेज कोमाकी मॉडेल्ससह भारतीय ग्राहकांची मने जिंकल्यानंतर, आम्ही DT3000 ही हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत. ते म्हणाले की, इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ही स्कूटर युनिक असेल कारण त्यात 3000W BLDC मोटर आणि 72V52Ah पेटंट लिथियम बॅटरी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 12 पेक्षा जास्त खास फीचर्स आहेत.
इतर बातम्या
अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील