नवी दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, दिल्लीमधील इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर Komaki ने गेल्या महन्यात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. त्यानंतर Komaki ने आता इलेक्ट्रिक मोटारसायकल लाँच केली आहे. (Komaki introduces new electric motorcycle in India at RS 95,000, know details)
कोमाकीने नवीन एमएक्स 3 (MX3) इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतात लाँच केली आहे. 2021 मधील ईव्ही उत्पादक (कोमाकी) कंपनीचे हे चौथे उत्पादन आहे, कारण कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला बाजारात तीन टॉप-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी सादर केल्या आहेत. कोमाकी एमएक्स 3 ची किंमत 95,000 (एक्स-शोरूम, भारत) आहे. कोमाकी एमएक्स 3 चा दावा आहे की, ही बाईक सिंगल चार्जवर 85-100 किमी धावेल. ही रेंज तुमच्या रायडिंग स्टाईलवर अवलंबून आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाईक पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 1-1.5 युनिटपेक्षा जास्त उर्जा वापरत नाही आणि एकूणच पेट्रोलवर सुरु असलेल्या खर्चाच्या दृष्टीने ही “पॉकेट फ्रेंडली” बाईक आहे. या बाईकची बॅटरी सोयीस्करपणे चार्ज करता यावी, यासाठी यामध्ये रीमुव्हेबल Li-ion बॅटरी देण्यात आली आहे. गार्नेट रेड, डीप ब्लू आणि जेट ब्लॅक या तीन पेंट स्कीम्ससह ही बाईक सादर करण्यात आली आहे.
Komaki MX3 अनेक अत्याधुनिक सुविधांसह सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये सेल्फ डायगनॉसिस अँड रिपेयर स्विच, रिजेनरेटिव्ह डुअल डिस्क ब्रेकिंग, पार्किंग आणि रिव्हर्स असिस्ट, एक इनबिल्ट ब्लूटूथ स्पीकर, 3-स्पीड मोड आणि एक फुल कलर LED डॅशचा समावेश आहे.
या बाईकमधील यांत्रिकी घटकांबद्दल (मेकॅनिकल कम्पोनंट्स) बोलायचे झाल्यास, यामध्ये 17-इंचाचे अॅलोय व्हील्स, टेलीस्कोपिक शॉक अॅब्सॉर्बर, अलोय व्हील्स आणि डिस्क ब्रेक आहेत, तर फ्रंट हेडलॅम्प्स आणि टेल लॅम्पवर हॅलोजन, ब्लिंकर आणि एलईडी युनिट देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, कोमकीने भारतात TN95, SE आणि M5 इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सदेखील सादर केल्या. TN95 मोटारसायकल आणि SE इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत अनुक्रमे 98,000 आणि 96,000 रुपये इतकी आहे. तर M5 इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 99,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…
केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री
तुमची कार आता HP च्या पेट्रोल पंपावर होणार चार्ज, देशभरात EV नेटवर्क तयार