नवी मुंबई : तुम्ही बाईक (Bike) चालवून थकला आहात का? तुम्हाला कार (Car) घ्यावी वाटतेय का, कार घ्यावी देखील वाटत असले पण बजेटचा प्रश्न असल्यास काळजी करू का, आम्ही तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये (Low Budget Car) येईल इतकी स्वस्त कार आज दाखवणार आहोत. ही कार तुमच्या बजेटमध्ये असून स्वस्त आणि मस्त आहे. त्यामुळे काळजी करू नका, फक्त ही बातमी वाचा. कारण बाजारात पाच लाख रुपयांपेक्षा स्वस्तात अनेक कार उपलब्ध आहेत. अनेकदा असं दिसून येतं की लोकांना कार घ्यायची असते पण बजेट आड येतं. पैसे कमी पडतात. पण जर तुमचे बजेट जवळपास 5 लाख रुपये असेल तर तुमचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. नवीन कारसह तुम्ही तुमच्या कुटुंबाला उत्तम आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देखील देऊ शकता. मारुती सुझुकी, डॅटसन आणि रेनॉल्टसारख्या कार कंपन्या भारतीय कार बाजारात स्वस्त कार देतात. याविषयी अधिक जाणून घ्या…
मारुती सुझुकी अल्टो 800 ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही कार 796 सीसी इंजिनसह येते. मारुती अल्टो ही 5 सीटर कार आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपये आहे. मारुती अल्टो 800 चे मायलेज 22.05 kmpl आहे.
मारुती सुझुकीची पुढील ऑफर S-Presso आहे. ही कार 998 सीसी इंजिनच्या पॉवरने सुसज्ज आहे. दुसरीकडे, मारुती एस-प्रेसो कार एक लिटर पेट्रोलवर 21.4 किमी पर्यंत धावू शकते. मारुती S-Presso ची एक्स-शोरूम किंमत 4.25 लाख रुपये आहे. ही कार देखील 5 सीटर कार आहे.
Eeco ही मारुती सुझुकीची पाच लाखांपेक्षा स्वस्त कारमधील तिसरी कार आहे. 1196 cc इंजिन मारुती Eeco मध्ये पॉवर देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.63 लाख रुपयांपासून सुरू होते. ही 5 सीटर कार एक लिटर पेट्रोलवर 16.11 किमी अंतर कापू शकते.
Datsun GO ही आणखी एक मजेदार कार आहे ज्याची किंमत 5 लाखांपेक्षा कमी आहे. ही देखील 5 सीटर कार आहे आणि 1198 cc चे इंजिन आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 4.63 लाख रुपये आहे. ही कार एक लिटर पेट्रोलवर 19 किमी धावू शकते.
Renault Kwid ही भारतातील सर्वात स्वस्त कार आहे. ही 5 सीटर कार आहे आणि अनेक प्रकारांमध्ये येते. त्याची एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपयांपासून सुरू होते. मायलेजच्या बाबतीत, Renault Kwid एक लिटर पेट्रोलवर 22.25 किमी प्रवास करू शकते.