मुंबई : भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या भारतीयांची मागणी आणि पसंती लक्षात घेत गाड्या डिझाईन करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. निसान कंपनीने गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. दरम्यान, निसान इंडियाने सोमवारी घोषणा केली आहे की, फेब्रुवारी महिन्यात या कारच्या तब्बल 4224 युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये ही कार सध्या धुमाकूळ घालत आहे. (Magnite leads the way as Nissan achieves this much wholesales in february)
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले की, कंपनी चेन्नईतील आपल्या फॅसिलिटी सेंटमध्ये प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरियड) कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. प्लांटमध्ये काम करणारे कर्मचारी तीन शिफ्ट्समध्ये कठोर परिश्रम घेऊन काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीवास्तव म्हणाले होते की, निसान इंडिया सध्या दर महिन्याला मॅग्नाईटच्या 2 हजार 500 युनिट्सचे उत्पादन करत आहे. हे उत्पादन अजून वाढवलं जाणार आहे. येत्या काळात कंपनी मॅग्नाईट एसयूव्हीच्या 3 हजार 500 ते 4 हजार 500 युनिट्सचे उत्पादन करणार आहे. या कारचा वेटिंग पिरियड खूपच जास्त आहे. तो वेटिंग पिरियड 2-3 महिन्यांपर्यंत कमी करणे हेच आमचे उद्दीष्ट आहे.
दरम्यान, लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती दिल्लीतल्या काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nissan Magnite waiting period Stretches to 8 months)
कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.
1. Magnite XE – 4.99 लाख रुपये
2. Magnite XL – 5.99 लाख रुपये
3. Magnite XV – 6.68 लाख रुपये
4. Magnite XV Premium – 7.55 लाख रुपये
5. Magnite Turbo XL – 6.99 लाख रुपये
6. Magnite Turbo XV – 7.68 लाख रुपये
7. Magnite Turbo XV Premium – 8.45 लाख रुपये
8. Magnite Turbo XL CVT – 7.89 लाख रुपये
9. Magnite Turbo XV CVT – 8.58 लाख रुपये
10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.35 लाख रुपये
Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.
या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.
⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.
⦁ LED DRL, LED इंडिकेटर
⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स
⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.
Nissan Magnite मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza), ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), फोर्ड इकोस्पोर्ट (Ford Ecosport), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300), टोयोटा अर्बन क्रुझर (Toyota Urban Cruiser), होंडा WR-V (Honda WR-V) आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट (Kia Sonet) या कारशी थेट टक्कर होत आहे.
हेही वाचा
भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
टाटा मोटर्सची नवीन सफारी लॉन्च, जाणून घ्या गाडीची काय आहेत हटके फिचर्स?
केवळ 2,499 रुपयात घरी न्या होंडाची शानदार बाईक आणि स्कूटर, मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक
(Magnite leads the way as Nissan achieves this much wholesales in february)