मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra) शुक्रवारी 2020-21 च्या मार्च तिमाहीचा (Q4FY21) 164 कोटी रुपयांचा एकत्रित नफा (Consolidated Profit) नोंदवला आहे. जो 840 कोटी रुपयांच्या मोठ्या नुकसानामुळे प्रभावित होता. परंतु महिंद्रा अँड महिंद्राला मागील तिमाहीत 3,255 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. (Mahindra and Mahindra earned profit of 164 crores in Corona pandemic situation)
महिंद्रा अँड महिंद्रानेही कंपनीच्या 75 व्या वर्षाच्या समाप्तीच्या निमित्ताने वित्तीय वर्ष 2021 साठी प्रति शेअर सर्वाधिक 8.75 रुपये लाभांश जाहीर केला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत महिंद्रा अँड महिंद्राचा महसूल वार्षक आधारावर 48 टक्क्यांनी वाढून 13,338 कोटी रुपये इतका झाला आहे. चौथ्या तिमाहीत Mahindra & Mahindra ला 13,001.5 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा विश्लेषकांकडून व्यक्त केली जात होती, तर निव्वळ नफा 1,012.8 कोटी रुपये होता.
कंपनीने 1,960 कोटींवर व्याज, कर, डिप्रेशिएशन आणि ऋणमुक्ती (Ebita) आधी उत्पन्नाची नोंद केली. वस्तूंच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली असली तरी, तिमाहीत ऋणमुक्तीची मार्जिन 14.7 टक्क्यांवर होती, तर Q4FY20 मध्ये 13.6 टक्के होती.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (Mahindra And Mahindra Ltd.) कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याचं पाच वर्षांचं वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. महिंद्राच्या कौटुंबिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत ही मदत दिली जाणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या कर्मचार्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.
Mahindra And Mahindra ने आपल्या कर्मचार्यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे, ज्याअंतर्गत कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या 12 वी इयत्तेपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करेल.
शाह यांनी एमअँडएमच्या 25,000 कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भावामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझं थोडं कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे, त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत.
महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच महिंद्राने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये Thar SUV, Bolero, Scorpio, XUV300 या गाड्यांचा समावेश आहे.
कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
इतर बातम्या
टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु
कोरोनाविरुद्धच्या लढाईत Force Motors चा मदतीचा हात, 50 Trax Ambulance महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द