Mahindra Thar 51000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सर्व व्हेरिएंट्सच्या नव्या किंमती

| Updated on: Apr 16, 2022 | 4:26 PM

महिंद्राने (Mahindra) अलीकडेच आपल्या कारच्या किमती वाढवण्याची (Price Hike) घोषणा केली आहे, त्यानंतर महिंद्राच्या ऑफ-रोड एसयूव्ही म्हणजेच महिंद्रा थारच्या (Mahindra Thar) किमती वाढल्या आहेत.

Mahindra Thar 51000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सर्व व्हेरिएंट्सच्या नव्या किंमती
Mahindra Thar
Follow us on

Mahindra Thar Price in India: महिंद्राने (Mahindra) अलीकडेच आपल्या कारच्या किमती वाढवण्याची (Price Hike) घोषणा केली आहे, त्यानंतर महिंद्राच्या ऑफ-रोड एसयूव्ही म्हणजेच महिंद्रा थारच्या (Mahindra Thar) किमती वाढल्या आहेत. आता ही कार खरेदी करण्यासाठी ग्राकांना 51000 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महिंद्र थार अनेक चांगल्या फीचर्ससह आणि मजबूत केबिन थीमसह येते. या कारला 2.0 लिटर टर्बोचार्ज इंजिन मिळेल. तसेच, यात इनलाइन 4 पेट्रोल पॉवर प्लांट इंजिन मिळेल. चला तर मग महिंद्रा थारच्या सर्व व्हेरिएंटची किंमती जाणून घेऊया.

महिंद्रा थार पेट्रोल व्हेरिएंटची किंमत आता 13.75 लाख ते 15.75 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर पेट्रोल व्हेरियंटची किंमत 16.03 लाख ते 16.03 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. पेट्रोल व्हेरियंटची किंमत 13.17 लाख रुपये ती 15.33 लाख रुपयांपर्यंत गेली आहे. आणि डिझेल व्हेरियंटची किंमत 13.38 लाख ते 15.53 लाखांपर्यंत आहे.

महिंद्रा थारमध्ये दोन प्रकारचे इंजिन

महिंद्रा थार भारतीय बाजारपेठेत दोन इंजिन पर्यायांमध्ये येते, त्यापैकी एक 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड, इनलाइन 4 पेट्रोल पॉवर प्लांट आहे, जे 150 PS पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 2.2 लिटर, टर्बोचार्ज्ड, इनलाइन 4 डिझेल इंजिन मिळेल, जे 130 PS पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

Mahindra Thar

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या आवडीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शन्ससह नवीन महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या कारमध्ये 2.0 लिटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे जे 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करु शकते. तर, 2.2 लिटर डिझेल इंजिन 130 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. नवीन ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही कार 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंटेड स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स