नवी दिल्ली : महिंद्रा लॉजिस्टिकने (Mahindra Logistics) मंगळवारी ऑक्सिजन ऑन व्हील्स (Oxygen on Wheels) ही सेवा सुरू केली आहे, जी एक मोफत सेवा आहे. याद्वारे ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी उत्पादक आणि रुग्णालये तथा वैद्यकीय केंद्र जोडण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर अशा शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर महिंद्राने आता हा उपक्रम देशाची राजधानी दिल्लीतही सुरु केला आहे.
ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या उद्देशाने कंपनीने महाराष्ट्रात एकूण 100 वाहने तैनात केली आहेत. राज्यात दररोज सुमारे 600 ओ 2 सिलेंडर्स (Oxygen Cylinders) बोलेरो पिकअप ट्रकसह वितरीत करण्याचं काम सुरु आहे. (Mahindra Oxygen on Wheels rolls out in Delhi after Maharashtra)
कंपनीने म्हटले आहे की, आम्ही राजघाट आणि मायापुरी ऑक्सिजन डेपो येथून SOS ऑक्सिजन सिलेंडर्स रूग्णालयात नेत आहोत. आपला देश पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट झेलत आहे. अशा परिस्थितीत आपलं योगदान देण्याची संधी आणि पाठिंब्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आभार. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, येत्या काही दिवसांत दिल्लीतील कामकाज वाढण्याबरोबरच आम्ही शेजारच्या केंद्रांवर पोहोचवत आहोत.
We’re scaling up operations in Delhi in the coming days as well as expanding reach to neighbouring centres. O2W is already operating at Pune, Chakan, Pimpri-Chinchwad, Nasik and Nagpur, delivering about 600 O2 cylinders every day with Bolero pickup trucks.(2/2) pic.twitter.com/6VF4q9gr6o
— anand mahindra (@anandmahindra) May 5, 2021
महिंद्रा अँड महिंद्रा म्हटले आहे की, ही सेवा महिंद्रा लॉजिस्टिकच्या सीएसआर उपक्रमांतर्गत होईल, ज्याने या प्रकल्पासाठी प्रशासन आणि स्थानिक सरकारी संस्थांशी भागीदारी केली आहे. दिल्लीसह इतर शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याबाबत शहरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा सुरु असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या सर्व राज्यात ही सेवा सुरु करण्याचा विचार सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महिंद्रा कंपनीनेदेखील या कोरोना साथीच्या आजारात लोकांना मदत करण्यासाठी बोलेरो पिकअप ट्रकचा वापर केला आहे. त्याच्या मदतीने ही कंपनी ऑक्सिजनचे वितरण करत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने या उपक्रमाला Oxygen on Wheels असे नाव दिले आहे. या उपक्रमाद्वारे गरजूंपर्यंत आणि रुग्णालयात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम केले जात आहे.
संबंधित बातम्या
Coronavirus News Updates: देशात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी
तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा
(Mahindra Oxygen on Wheels rolls out in Delhi after Maharashtra)