नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत Mahindra Thar कारचे वेगळे आकर्षण आहे. तसेच, ही महिंदाची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही (SUV) कार आहे. चांगली गोष्ट म्हणजे, सध्या ही कार विकत घेण्याची तुम्हाला उत्तम संधी आहे. कंपनी Thar 4×4 वर जबरदस्त (मोठ्या प्रमाणात) सूट (big discount) देत आहे. ही सवलत त्याच्या थार फोर व्हील ड्राइव्हच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारच्या गाड्यांवर लागू आहे.
महिंद्रा थारचे AX (O) आणि LX असे दोन व्हेरिअंट असून ती या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येऊ शकते. एसयूव्हीमध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. पहिले 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) ला जोडलेले आहे. दुसरे 2.2-लिटर डिझेल इंजिन आहे, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सेसमध्ये येते. हे इंजिन फक्त फोर व्हील ड्राइव्ह (4WD) सह येते.
याशिवाय, तिसरे इंजिन 2.0-लीटर पेट्रोल युनिट आहे, ज्यामध्ये स्वयंचलित आणि मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत. हे इंजिन RWD आणि 4WD दोन्हीमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
त्याचे 1.5L डिझेल इंजिन 118bhp पॉवर आणि 300Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर त्याचे 2.2L डिझेल इंजिन 130bhp आणि 300Nm आउटपुट देते. याशिवाय, पेट्रोल इंजिन 152bhp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते.
Mahindra Thar 4WD ची किंमत आणि डिस्काऊंट
Mahindra Thar 4WD ची किंमत 13.87 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. कंपनी आपल्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
Mahindra च्या या गाड्यांवरही मिळत आहे सूट
थार व्यतिरिक्त महिंद्रा कंपनीच्या इतर वाहनांवरही सूट दिली जात आहे. Mahindra Marazzo वर 72,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. महिंद्रा बोलेरोवर 66 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. दुसरीकडे, XUV300 ही कार 52,000 रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केली जाऊ शकते. तसेच बोलेरो निओवर 48,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.