भारतीय बाजारपेठेत या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये एकापेक्षा एक नवीन एसयूव्ही गाड्या ग्राहकांसाठी लाँच करण्यात आल्या आहेत. भारतात एसयूव्हीबाबत ग्राहकांमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेता अनेक नवे मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या एसयूव्ही मॉडेल लाँच केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया 2024 मध्ये महिंद्रा आणि टाटा मोटर्ससह कोणत्या कंपन्यांनी तुमच्यासाठी नवीन वाहने लाँच केली आहेत?
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर फोर्स मोटर्सने यावर्षी मे महिन्यात त्यांच्या वाहनाचे पाच दरवाजे असलेल्या गाडीचे मॉडेल लाँच केली आहे. या कारमध्ये २.६ लीटर डिझेल इंजिन आणि ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये तुम्हाला 4 व्हील ड्राइव्हचा पर्यायही मिळेल, या एसयूव्हीची किंमत 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
टाटा मोटर्सने यावर्षी आपल्या लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचा इलेक्ट्रिक गाडी ग्राहकांसाठी लाँच केली आहे. या कारमध्ये 25kWh आणि 35kWh असे दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत, जे एकदा चार्ज केल्यावर तुम्हाला अंदाजे ३१५ किमी आणि ४२१ किमीपर्यंत ची रेंज देतात. या गाडीची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख (एक्स-शोरूम) ते 14.29 लाख (एक्स-शोरूम) आहे.
यावर्षी सिट्रॉन कंपनीने ऑगस्टमध्ये ग्राहकांसाठी नवीन एसयूव्ही बेसॉल्ट लाँच केली आहे. यात दोन पेट्रोल इंजिन, 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड आणि 1 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन पर्याय देण्यात आले आहे. या कारची किंमत 8 लाख (एक्स-शोरूम) ते 13.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
३ डोअर असलेल्या थारचे ५ डोअर मॉडेल यावर्षी ऑगस्टमध्ये ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहे.ही थार तुम्हाला दोन इंजिन ऑप्शनसह मिळेल, लक्षात घ्या की तुम्हाला 4 व्हील ड्राइव्ह फीचर फक्त डिझेल व्हेरियंटमध्ये मिळेल. या कारची एक्स-शोरूम किंमत 13 लाख रुपये (एक्स-शोरूम) ते 22.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
टाटा मोटर्सची पहिली कूप एसयूव्ही यावर्षी भारतात लाँच करण्यात आली असून, ही कार पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक या तिन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ही कार सिट्रॉन कंपनीच्या बेसाल्ट एसयूव्हीला टक्कर देते, या गाडीची किंमत 10 लाख (एक्स-शोरूम) ते 19 लाख (एक्स-शोरूम) असेल.
महिंद्राची इलेक्ट्रिक एसयूव्ही नुकतीच 59kWh आणि 79kWh बॅटरीसह लाँच करण्यात आली होती जी अंदाजे ५५६ किमी आणि ६८२ किमी पर्यंत रेंज चा दावा करते. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 18 लाख 90 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे.
स्कोडाने कायलॅकसह सब-4 मीटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे, जे 1-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. या कारची एक्स शोरूम किंमत 7.89 लाख (एक्स-शोरूम) ते 14.40 लाख (एक्स-शोरूम) आहे.
महिंद्राने ग्राहकांसाठी बीई 6ई सह 9 ई देखील लाँच केली आहे, ही कार देखील 59kWh आणि 79kWh बॅटरीसह लाँच करण्यात आली आहे, ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर या कारला 656 किमीपर्यंत रेंज मिळेल. या गाडीची किंमत 21.90 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.