अरेरे! 1 जानेवारीपासून महिंद्राच्या गाड्यांची किंमत वाढणार; जाणून घ्या कारण

| Updated on: Dec 16, 2020 | 9:43 AM

महिंद्रा कंपनीकडून अगदी बजेट रेंजपासून ते एसयुव्ही श्रेणीतील अशा सर्वप्रकारच्या गाड्यांची निर्मिती केली जाते. | Mahindra and Mahindra

अरेरे! 1 जानेवारीपासून महिंद्राच्या गाड्यांची किंमत वाढणार; जाणून घ्या कारण
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेतील महिंद्रा या आघाडीच्या वाहननिर्मिती कंपनीच्या गाड्यांची किंमत येत्या 1 जानेवारीपासून वाढणार आहे. महिंद्राने प्रवासी आणि व्यावसायिक दोन्ही श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इनपूट कॉस्ट वाढल्याने आणि कमोडिटीच्या किंमतीमधील तेजीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते. (Mahindra to increase price of vehicles from January 1)

महिंद्राच्या गाड्यांची किंमत नेमकी किती वाढणार?

महिंद्रा कंपनीकडून अगदी बजेट रेंजपासून ते एसयुव्ही श्रेणीतील अशा सर्वप्रकारच्या गाड्यांची निर्मिती केली जाते. आता प्रत्येक गाडीच्या किंमतीत नेमकी किती वाढ होणार, हे महिंद्राकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच महिंद्रा कंपनीकडून गाड्यांच्या काही मॉडेल्सवर डिस्काउंट देण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये महिंद्राच्या नव्या गाड्यांचा समावेश नाही. BS6 कंप्लायंट महिंद्रा गाड्यांसाठीची ही डिस्काउंट ऑफर होती. या डिस्काऊंट ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि अन्य ऑफर्सचा समावेश होता. ही ऑफर केवळ डिसेंबर महिन्यापर्यंतच लागू आहे.

2.20 लाखांपर्यंत डिस्काउंट

महिंद्राची फ्लॅगशिप SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2.20 लाखांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय, 50 हजारांचा एक्स्चेंज बोनसही मिळतो. तसेच 16 हजार ते 20 हजारापर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंटही महिंद्रा कंपनीकडून दिली जाते.

त्यामुळे तुम्ही महिंद्रा गाडी घ्यायचा विचार करत असाल तर डिस्काउंट ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे आता 15 दिवस उरले आहेत.

1 जानेवारीपासून ‘किआ’च्या वाहनांची किंमत वाढणार

येत्या जानेवारी महिन्यापासून किआ या कंपनीच्या गाड्यांच्या किंमतीमध्येही मोठे बदल होणार आहेत. गेल्याचवर्षी वाहननिर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेल्या किआ (Kia motors) कंपनीची मॉडेल बाजारपेठेत चांगलीच लोकप्रिय ठरली होती. मात्र, आता या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार असल्याने वाहनप्रेमींच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Hyundai च्या Santro, Grand i10 सह ‘या’ गाड्यांवर 1 लाख रुपयांपर्यंतची सूट

कारप्रेमींच्या आनंदावर विरजण; 1 जानेवारीपासून ‘या’ कारची किंमत वाढणार

डिसेंबरमध्ये किफायतशीर कार खरेदी करण्याची संधी, रेनॉ KWID वर 20,000 रुपयांचा डिस्काऊंट

(Mahindra to increase price of vehicles from January 1)