मुंबईः भारतीय कार बाजारात कॉम्पॅक्ट एसयुव्ही कारचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. टाटा पंचपासून (Tata Punch), मारुती ब्रेझापर्यंत (Maruti Brezza) भारतात अनेक कॉम्पॅक्ट एसयुव्ही (SUV) कारचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक नवीन कार कंपन्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार्सची निर्मिती करण्यामध्ये व्यस्त दिसत आहे. त्यापैकी काहींची चाचणीही सुरू आहे आणि येत्या सहा महिन्यांत त्या लॉन्च केल्या जाऊ शकतात. ग्राहकांची एसयुव्ही कार्सना अधिक मागणी आहे. त्यानुसार ग्राहकांची आवड पाहून अनेक कार निर्माता कंपन्या एसयुव्ही कार्सची निर्मिती करीत आहे. अनेक कार्स निर्मात्या कंपन्यांनी त्यात कस्टमायझेशनची सुविधाही दिली आहे. आज आपण अशाच काही कारबद्दल माहिती घेणार आहोत.
1) Hyundai Venue N-Line
Hyundai कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये एक नवीन कार लॉन्च करणार आहे. ही कार 6 सप्टेंबरला दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवीन वेन्यू एन लाईनमध्ये 1.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. हे DCT गिअरबॉक्ससह येईल. त्यात काही मेकॅनिकल तर काही कॉस्मेटिक अपडेट्स केले जातील. ही कार स्पोर्टी लूकमध्ये नॉक करेल.
2) Mahindra XUV300 Facelift
महिंद्रा आपल्या XUV300 चे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करणार आहे. अपकमिंग कारमध्ये नवीन डायनॅमिक आणि अनेक सुरक्षा फीचर्स देखील पाहायला मिळतील. नवीन फीचर्स व्यतिरिक्त यात टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिसेल. मात्र, कंपनीने आतापर्यंत अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केलेला नाही.
3) Maruti YTB Coupe SUV
ऑटो एक्स्पो दरम्यान शोकेस केली गेलेली मारुती आपली नवीन कार देखील लॉन्च करणार आहे. बलेनो हॅचबॅकचे हे एसयूव्ही मॉडेल आहे. यात मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि पुश बटण स्टार्ट असे पर्याय मिळतील. या वर्षी बलेनोमध्ये हेडअप डिस्प्ले फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
4) Honda Compact SUV
Honda देखील भारतीय बाजारपेठेसाठी कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आपली नवीन कार तयार करत आहे. हे Honda Amaze सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. यासोबतच अॅमेझफिटप्रमाणे पॉवरट्रेनही वापरण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही कार लॉन्च केली जाऊ शकते.