Marathi News Automobile Market entry of new MG Hector Blackstorm Edition ; The atmosphere is tight with a killer look
MG Hector हेक्टरचं आलं वादळं; लूकच एकदम किलर
MG Hector Black Storm Edition : भारतीय बाजारात MG Hector ने काळ्या रंगाच्या थीमवर ब्लॅकस्टॉर्म एडिशन बाजारात उतरवली आहे. कसे आहे या कारचे डिझाईन, फीचर्स, इंजिन आणि किंमतीविषयी जाणून घ्या...
1 / 5
ब्लॅकस्टॉर्म एडिशन काळ्या रंगांच्या थीमवर आधारीत आहे. स्टँडर्ड मॉडलमध्ये क्रोम वर्कच्या ऐवजी गन-मेटल फिनिशिंग मिळेल. याशिवाय विंग मिरर, हँडलँप आणि ब्रेक कॅलीपर्स लालरंगात हायलाईट करण्यात आले आहे. या SUV मध्ये 18 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे.
2 / 5
ही प्रीमियम SUV तीन आसनी पर्यायात मिळत आहे. यामध्ये 5-सीटर, 6-सीटर आणि 7-सीटर मॉडल उपलब्ध आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायात खरेदी करता येईल. या एडिशनमध्ये पेट्रोल+मॅन्युअलचा पर्याय देण्यात आलेला नाही.
3 / 5
Hector Blackstorm Edition मध्ये 14 इंचाची पोट्रेट टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनॉरमिक सनरूफ, LED टेललँप, LED प्रोजेक्टर हेडलँम्प, वायरलेस फोन चार्जर, ॲपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
4 / 5
नवीन हेक्टरला 1.5 लिटर टर्बो पेट्रोल-CVT आणि 2.0 लिटर डिझल-मॅन्युअल इंजिन गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोल इंजिन 143bhp ची पॉवर आणि डिझेल इंजिनला 170bhp पॉवर जनरेट करते.
5 / 5
हेक्टरला ब्लॅकस्टॉर्म ॲडिशन, स्टँडर्ड मॉडलपेक्षा 25 हजार रुपयांनी महाग आहे. पेट्रोल-सीव्हीटी व्हेरिएंटची किंमत 21.25 लाखापासून सुरु होते. डिझेल-मॅन्युअल ट्रान्समिशनच्या 6-सीटर मॉडेलची किंमत 22.76 लाख रुपये आहे. या किंमतीत फरक पडू शकतो.