मुंबई- भारतीय बाजारात एकापेक्षा एक सरस गाड्या आहेत. भारतीय मार्केट पाहता ऑटो कंपन्या एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल करत असतात. मात्र इतक्या गाड्यांमध्ये आपल्याला आवश्यक गाडी कशी निवडावी असा प्रश्न पडतो. खिशाला परवडणारी आणि जबरदस्त फीचर्स असलेल्या गाडीच्या शोधात असतो. भारतीय ग्राहक मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती देतो. यामध्ये मारुति एस प्रेस्सो मिड रेंज असलेली जबरदस्त कार आहे. रेनॉल्ट क्विड या गाडीशी स्पर्धा करते. या दोन्ही गाड्या पाच जणांना बसण्यासाठी तयार केल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणती गाडी निवडावी असा प्रश्न ग्राहकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही गाड्यांची तुलना करून सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला योग्य गाडी निवडण्यास मदत होईल.
कोणतीही गाडी घेण्यापूर्वी त्या गाडीची किंमत सर्वात आधी लक्षात घ्यावी लागते. आपल्या बजेटमध्ये गाडी बसते हा प्रश्न सर्वात आधी पडतो. भारतीय बाजारात एस प्रेस्सोच्या बेसिक व्हेरियंटची किंमत 4.25 लाखांपासून सुरु होते आणि 6.10 लाखांपर्यंत जाते. दुसरीकडे रेनॉल्ट क्विडची बेसिक व्हेरियंटची किंमत 4 लाख 70 हजार रुपयांपासून सुरु होते.
किंमत जाणून घेतल्यानंतर कोणती गाडी कमी इंधनात जास्त मायलेज देते असा प्रश्न पडतो. तर दोन्ही गाड्यांचं मायलेज जबरदस्त आहे. रेनॉल्ट क्विड 16 किमी लिटर मायलेज देते. मारुति एस-प्रेस्सो 17 किमी प्रति लिटर मायलेज देते. रेनॉल्ट क्विडची टँक कॅपसिटी 28 लिटर, तर मारुति एस प्रेस्सोची टँक कॅपासिटी 27 लिटर आहे.
मारुति एस प्रेस्सोचं इंजिन 998 सीसी 5500 आरपीएमवर 65.7 बीएचपी पॉवर आणि 3500 आरपीएमवर 89 एनएम टॉर्क जनरेट करते. रेनॉल्ट क्विड 999 सीसी 5500 आरपीएमवर 67 बीएचपी पॉवर आणि 4250 आरपीएमवर 91 एनएम टॉर्क जनरेट करेल. दोन्ही गाड्यांमध्ये जवळपास सारखंच इंजिन कॅपसिटी असून मारुति एसप्रेस्सो जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करते.
दोन्ही गाड्यांमध्ये सुरक्षा फीचर्स जबरदस्त आहे. रेनॉल्ट क्विडमध्ये डे नाइट रियर व्यू मिरर आहे. ही सुविधा मारुति एस प्रेस्सोमध्ये नाही. क्विडमध्ये पार्किंग रियर कॅमेरा असून एस प्रेस्सोमध्ये नाही. तर एस प्रेस्सोमध्ये हिल असिस्ट सुविधा असून क्विडमध्ये नाही. त्याचबरोबर एस प्रेस्सोमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह 7 इंच इंफोटेनमेंट सिस्टम, फ्रंट पॉवर विंडो आणि कीलेस एंट्रीसारखे फीचर्स दिले आहेत. एस प्रेस्सोमध्ये 270 लीटर बूट स्पेस आहे.