नवी दिल्ली | 11 February 2024 : पेट्रोल, डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक, फ्लेक्स फ्युएल यासोबतच ग्राहक हायब्रीड कारवर पण फिदा आहेत. अशा कारची पण बरीच मागणी आहे. या कार ICE इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरच्या आधारे धावतात. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांना टफ फाईट देत आहे. टाटा कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लांब उडी घेतली आहे. इतर कंपन्या हायब्रीड कारवर जोर देत आहेत. मारुती सुझुकीने सर्वात स्वस्त एसयुव्ही Fronx ही हायब्रीड कार बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे.
या कार आणण्याची तयारी
एप्रिल 2020 मध्ये मारुतीने डिझेल कारचे उत्पादन थांबवले. त्यानंतर कंपनीने पेट्रोल आणि CNG पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रीत केले. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनी पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही Maruti eVX आणण्याच्या तयारीत आहे. यासोबतच मारुती सुझुकी हायब्रिड सेगमेंटमध्ये पण मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.
हायब्रीड Fronx ची चर्चा
ऑटोकारच्या वृत्तानुसार, मारुती सुझुकी 2025 पर्यंत त्यांची सर्वत स्वस्ती एसयुव्ही Maruti Fronx ची हायब्रीड कार बाजारात उतरवू शकते. मायलेज आणि लो मेंटनेंस बाबतीत मारुती सुझुकी नेहमीच पहिली आली आहे. तर गेल्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सने बाजारातील समीकरणे झटपट फिरवली आहेत. आतापर्यंत डिझेलची जड वाहन तयार करणाऱ्या टाटा समूहाने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मोठी झेप घेतली आहे. तर सीएनजी सेगमेंटमध्ये पण घुसखोरी केली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
काय आहे हायब्रिड कार